Suhas Kande Won: आमदार सुहास कांदे यांचा भुजबळ आणि मराठा कार्ड दोन्हींवर मात करीत विजय!

Suhas Kande; MLA Suhas Kande registered big victory, Shock to Rebel Sameer Bhujbal & independent Dr Rohan Borse-नांदगावचा निकाल अपेक्षित, भुजबळांचे पानिपत, आमदार कांदे यांनी घेतली भुजबळांच्या मतांच्या दुप्पट आघाडी राजकीय मोट जुळवण्यात कांदे यशस्वी.
Ganesh Dhatrak, suhas kande & Sameer Bhujbal
Ganesh Dhatrak, suhas kande & Sameer BhujbalSarkarnama
Published on
Updated on

MLA Suhas Kande Won: शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव मतदार संघात एकहाती निवडणूक जिंकली. त्यासाठी त्यांनी `सर्व प्रयोग` केले. त्यामुळे त्यांच्या विरोधकांचे त्यांनी अक्षरशः पानिपत केले. भुजबळ यांच्या राजकारणाला हा धक्का आहे.

मतदारसंघाच्या मतमोजणीत अखेरच्या पंचवीसाव्या फेरीत आमदार कांदे यांना एक लाख सव्वीस हजार २४१ मते मिळाली. त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी माजी खासदार समीर भुजबळ यांना चाळीस हजार ७९७ मते मिळाली. भुजबळ यांना मिळालेल्या मतांच्या दुप्पट मताधिक्याने कांदे विजयी झाले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गणेश धात्रक तिसऱ्या क्रमांकावर तर मराठा महासंघाने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार डॉ.रोहन बोरसे यांना सत्तावीस हजार मते मिळाली. कांदे यांनी राजकीय डावपेचांत सगळ्यांना गारद केले.

Ganesh Dhatrak, suhas kande & Sameer Bhujbal
Rahul Dhikale Won: राहुल ढिकले यांनी घडवला इतिहास, ११ जणांची अनामत केली जप्त!

नांदगाव मतदार संघात यंदा चौरंगी लढत होईल अशी अपेक्षा होती. मात्र अन्य तिन्ही उमेदवार खुपच मागे पडल्याचे दिसून आले. शिवसेना शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार सुहास कांदे हे महायुतीचे उमेदवार होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने गणेश धात्रक यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेच्या दोन्ही गटातील या पारंपारिक लढतील माजी खासदार समीर भुजबळ यांनी उडी घेतली.

Ganesh Dhatrak, suhas kande & Sameer Bhujbal
Chhagan Bhujbal Won: मंत्री छगन भुजबळ यांची जरांगे फॅक्टरवर मात, २६ हजार मतांनी विजयी!

माजी खासदार भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा राजीनामा देऊन उमेदवारी केली. त्यामुळे महायुतीत फूट पडली. ही फुट शिंदे गटाने खूपच गांभीर्याने घेतली. त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अन्य उमेदवारांवर देखील झाला.

मतदार संघातील या चौरंगी लढतीत मराठा महासंघाने मनोज जरांगे पाटील कार्ड खेळले. या मराठा कार्ड मुळे डॉ रोहन बोरसे या सामाजिक आणि कोरोना काळात नांदगाव तालुक्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलेल्या कार्यकर्त्याने निवडणुकीला स्थानिक विरुद्ध बाहेरचे आणि भूमिपुत्र असे वळण दिले.

नांदगावला भयमुक्त करण्याची घोषणा अपक्ष समीर भुजबळ यांनी केली. त्यांच्या प्रचाराचा सर्व भर विद्यमान आमदाराची दहशत आणि विविध यंत्रणांच्या मार्फत दाखल होणारे खोटे गुन्हे यावर होता. त्याची त्यांनी मोठ्या प्रमाणावर चर्चा घडवून आणली. विद्यमान आमदार यांनी मात्र विकास कामे आणि राबविलेल्या विविध योजना यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला. आमदार कांदे यांनी अतिशय बारीक-सारीक अभ्यास करून निवडणूक यंत्रणा उभी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या टप्प्यात सहभाग घेऊन आमदार कांदे यांना बळ दिले.

एकंदर नांदगाव मतदार संघात चौरंगी लढतीत तीन प्रमुख उमेदवार ओबीसी आणि अपक्ष डॉ बोरसे हे एकमेव मराठा उमेदवार होते. अन्य समाजातील घटकांनी देखील सेवाभावी प्रतिमा असल्याने डॉ बोरसे यांना पडद्यामागून मदत केली. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात या मतदारसंघातील निवडणुकीत वेगळाच सूर ऐकायला मिळाला.

तसा प्रचार कार्यकर्त्यांनी घरोघर पोहोचवला. सर्व प्रस्थापित नेते विद्यमान आमदारांच्या बाजूने, अन्य घटकांच्या यंत्रणा अपक्ष भुजबळ यांच्याकडे तर मराठा समाजातील शेतकरी आणि कार्यकर्ते अपक्ष उमेदवार डॉ. बोरसे यांच्या बाजूने असे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे यंदा नांदगावची निवडणूक पंधरा वर्षानंतर पहिल्यांदाच स्थानिक कार्यकर्त्यांनी हाती घेतल्याचे दिसून आले.

या मतदारसंघात मनमाड नगरपालिका आणि मालेगाव तालुक्यातील 55 गावे निर्णायक ठरली. शिवसेना ठाकरे पक्षाचे धात्रक हे मनमाड शहराचे उमेदवार होते. आमदार कांदे यांनी मनमाड शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा आणि रस्त्यांचा आपल्या प्रचारात प्रामुख्याने उल्लेख केला. त्याचा मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com