Dr Shefali Bhujbal & MLA Devyani Pharande Fugdi News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

डॉ. शेफाली भुजबळ अन्‌ भाजपच्या देवयानी फरांदेंची फुगडी रंगली!

महात्मा फुले जयंती मिरवणुकीत फुगडी खेळताना डॉ. शेफाली भुजबळ व आमदार प्रा. देवयानी फरांदे.

Sampat Devgire

नाशिक : परस्परविरोधी पक्षांच्या महिला (Womens) पदाधिकारी एकमेकांच्या हातात हात घेऊन फुगडी खेळल्याचे चित्र महात्मा फुले (Mahatma Phule) जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत बघायला मिळाले. एरव्ही एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडणाऱ्या पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या स्नुषा डॉ. शेफाली भुजबळ (Shephali Bhujbal) आणि भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे (Devyani Pharande) एकमेकांच्या हातात हात घालून फुगडी खेळताना दिसल्या. राष्ट्रवादी आणि भाजपच्या या फुगडीची चांगलीच चर्चा झाली. (Shefali Bhujbal - Devyani Pharande Fugdi News)

महात्मा फुले जयंतीनिमित्त बागवानपुरा येथून मिरवणूक काढण्यात आली होती. महात्मा फुले समाज विकास संस्था आणि संत सावता माळी फाउंडेशन अशा दोन मंडळांच्या रथाचा समावेश मिरवणुकीत करण्यात आला होता. तत्पूर्वी महात्मा फुले यांच्या पालखीचे उद्‌घाटन शेफाली भुजबळ, आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकप्रतिनिधींनी मिरवणूक काही अंतर पालखी खांद्यावर घेऊन मार्गस्थ केली. त्यानंतर बागवानपुरा, चौक मंडई, वाकडी बाराव, फुले मार्केट, दूध बाजार, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा चौक, मेन रोड, धुमाळ पॉइंट, दहीपूल मार्गे गणेशवाडी येथील महात्मा फुले पुतळा येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. स्त्री शिक्षण, साक्षरता जागृती देखाव्याचा मिरवणूक समावेश करण्यात आला होता.

या वेळी नगरसेविका वत्सला खैरे, सुषमा पगारे, आशा तडवी, माजी नगरसेविका रंजना पवार, माजी नगरसेवक संजय साबळे, अंबादास खैरे यांच्यासह बाजीराव तिडके, आरपीआय नेते मदन शिंदे, विलास नाईकवाडी, दिलीप नाईकवाडी, संदीप शिंदे, योगेश कमोद, बालम पटेल, नाना पवार, असिफ जानोरीकर, शरद मंडलिक, संगर मोटकरी, राजू बोडके, नाना नाईकवाडे, राका माळी आदी उपस्थित होते.

तुझी माझी जमली जोडी ग बाई...

भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी नेहमी एकमेकांवर ताशेरे ओडत असतात. असे असले तरी महात्मा फुले जयंती मिरवणुकीत काही वेगळे चित्र बघायला मिळाले. डॉ. शेफाली भुजबळ आणि भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी एकाच वेळेस श्रीफळ वाढवून केवळ मिरवणुकीची सुरवात केलीच नाही तर एकमेकांच्या हातात हात घेऊन एकमेकांना हास्य देत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. कट्टर विरोधक एकमेकांच्या हातात हात घालून फुगडी खेळताना उपस्थित पदाधिकारी आणि नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT