Dr Vijaykumar Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Vijay Kumar Gavit: आदिवासी विकास मंत्र्यांची कोटींची उड्डाणे; सोने, जमिनी आणि रोकडही

Dr. Vijaykumar Gavit Property Worth ₹30 Crores and Increased Income: डॉ विजयकुमार गावित यांच्याकडे तीस कोटींच्या जमिनी आणि घरे असून उत्पन्नातही वाढ झाली आहे.

Sampat Devgire

Nandurbar Vidhan Sabha: आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी नंदुरबार मतदार संघातून अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आपल्या मालमत्तेचे विवरणपत्र सादर केले आहे. त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवाराला आपल्या मालमत्ता आणि गुन्हे याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या अनेक ठिकाणी जमिनी आहेत.

मुंबईत फोर्ट तसेच वरळी यांसह विविध ठिकाणी सदनिका, घरे आहेत. त्यांचे आजचे बाजार मूल्य तीस कोटीहून अधिक आहे. १५ गावांत त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या जमिनी आहेत. त्यामुळे आदिवासी विकास मंत्री खऱ्या अर्थाने `जमीनदार` म्हणावे असे आहेत.

डॉ गावित यांच्याकडे ७.२५ लाख तर त्यांच्या पत्नीकडे ६.९६ लाख रुपयांची रोकड आहे. याशिवाय त्यांच्याकडे ६४.५१ लाखांच्या आणि पत्नीकडे १३ लाखांच्या विविध बँक खात्यात रक्कम जमा आहेत. डॉ गावित यांच्या विविध बँकांमध्ये ५६.४७ लाख रुपयांच्या ठेवी आणि २.५५ लाखांचे बंधपत्रे आहेत.

भाजप नेते डॉ. गावित कुटुंबीयांकडे ३३ लाखांची चार वाहने आहेत. याशिवाय त्यांच्याकडे ४३७ ग्रॅम सोने, एक किलो चांदी असे ७५ लाखांचे जडजवाहीर आहेत. या सर्व रकमांचे एकत्रित मूल्य ४.६२ कोटी रुपये आहे.

डॉ गावित यांच्याकडे विविध ठिकाणी शेत जमिनी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने देवपूर, चौपाळे, धुली, पथराई आदी गावांचा समावेश आहे. त्यांच्या पत्नीकडे वाघोडा, चौपाळे, पतोंडा, प्रकाश वाडा, पथराई, नवापूर, नंदुरबार, नील, जांबोली आदी गावांमध्ये शेती व बिगर शेती वाणिज्यीक जमिनी आहेत.

डॉ गावित आणि त्यांच्या पत्नीकडे मुंबईत फोर्ट येथे तसेच वरळी येथील शुभदा सोसायटीमध्ये दोन सदनिका आहेत. याशिवाय देवपूर, नंदुरबार, नटावद या ठिकाणी देखील त्यांची घरे आणि वाणिज्य संपदा आहे.

या सर्व घरे आणि वाणिज्य क्षेत्र असलेल्या जमिनीची मिळून एकत्रीत मूल्य ३०.२१ कोटी रुपये आहे. त्यांच्या बांधिव मालमत्तांचे मूल्य सुमारे १३.५६ कोटी आहे. एकंदरच आदिवासी विकास मंत्री गावित यांच्या निवासी इमारती, वाणिज्य ईमारती, शेती, बिगर शेती जमिनी, सदनिका आणि घरे यांचे मूल्य कोट्यावधींच्या घरात आहे. विविध गावात त्यांच्या जमिनी असल्याने त्यांना खऱ्या अर्थाने जमीनदार म्हणता येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT