Dr Vilas Bachhav & Sanjay Sonawane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr. Vilas Bachhav Politics: बाजार समितीच्या निकालातून नव्या राजकारणाची चाहूल? प्रस्थापित धास्तावले?

Market Committee Election Results: सत्तेसाठी एकत्र आलेल्या परस्पर विरोधी प्रतिस्पर्ध्यांना तरुण नेतृत्वाचा धोबीपछाड.

Sampat Devgire

Satana APMC News: सटाणा बाजार समिती निवडणुकीचा निकाल धक्कादायक ठरला. मध्ये सत्तेसाठी एकत्र आलेल्या परस्पर विरोधी प्रस्थापित नेत्यांना मतदारांनी नाकारले. यामध्ये विरोधकांना संपवण्याच्या नादात प्रस्थापित स्वतःच पराभूत झाले.

सटाणा तालुका जागरूक मतदार आणि तेवढेच जागरूक नेतृत्व असलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संजय चव्हाण आणि भाजपचे आमदार दिलीप बोरसे हे दोन गट येथे सक्रिय आहेत. या दोन्ही गटांना तालुक्यातील विविध संस्थांमध्ये वर्चस्व राखण्यासाठी संघर्ष करावा लागतो

यंदा सटाणा बाजार समितीच्या निवडणुकीत अतिशय वेगळ्या घडामोडी घडल्या. भाजपचे डॉ विलास बच्छाव यांनी प्रारंभी बिनविरोध निवडणुकीचा फार्स केला. त्याला वेगळाच वास येत असल्याने आमदार बोरसे या निवडणुकीपासून अलिप्त राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण यांनीही या निवडणुकीपासून अंतर ठेवणेच पसंत केले.

या निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे प्रतिस्पर्धी पॅनल निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न झाले. डॉ बच्छाव, नानाजी दळवी आणि राघो अहिरे हे लखमापूर या एकाच गावातील तिन्ही प्रस्थापित नेते एकत्र आले होते. बिनविरोध निवडणुकीचे डावपेच असताना प्रतिस्पर्धी संजय सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी जाणीवपूर्वक बाजूला सारण्याचा प्रयत्न केला होता.

डॉ. बच्छाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिस्पर्धी पॅनलला उमेदवारच मिळू नये, अशी सर्व व्यवस्था केली होती. मात्र तरुण कार्यकर्त्यांना हे पचनी पडले नाही. त्यांनी हे राजकारण मोडून काढण्यासाठी एकत्र येत श्री यशवंत शेतकरी विकास पॅनल केला. नऊ संचालक विजयी झाले. विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनलचे डॉ. बच्छाव, नानाजी दळवी या दोन्ही नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

या निमित्ताने तालुक्यातील राजकारणाला नवा संदेश गेला आहे. त्यामध्ये प्रस्थापित नेत्यांना हा धोक्याचा इशारा मानला जातो. सटाणा तालुक्यात राजकारणाचा सूर गवसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांनी या निमित्ताने तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे आमदार दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण या दोन्ही नेत्यांना आता या नव्या तरुणांना आपलेसे करण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT