Eknath Khadse & Gulabrao Patil
Eknath Khadse & Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहता अन् खानदेशी कलावंतांची उपेक्षा करता?

Sampat Devgire

जळगाव : वहीगायनासारखी लोककला (Khandeshi folk art) लोप पावण्याच्या मार्गावर आहे. कला जोपासणारे कलावंत हलाखीचे जीवन जगताहेत, पण खानदेशातील मुख्यमंत्री (Chief minister) होण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांनीही या कलावंतांची उपेक्षाच केली, असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) नाव न घेता लगावला.

रविवारी शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात झालेल्या खानदेशस्तरीय वहीगायन लोककलावंत संमेलनाच्या उद्‌घाटप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, की रात्री वहीचे गायन करणारा हा दिवसा बेरोजगार असल्याची टीका करण्यात येते. याच आपल्या मातीतल्या कलावंतांची कुणालाही कदर नाही. अगदी खानदेशी मुख्यमंत्री हवा, अशी इच्छा बाळगणाऱ्यांनी कधी खानदेशी कलावंतांना न्याय मिळवून दिला का, असा प्रश्‍नही गुलाबराव पाटलांनी उपस्थित केला.

खानदेशस्तरीय वहीगायन लोककलावंत संमेलनाच्या निमित्ताने पालकमंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना राजकीय चिमटा काढला. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात पारंपारीक राजकीय वितुष्ट आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत हा वाद टोकाला गेला. त्यानिमित्ताने दोन्ही बाजुंकडून आरोप प्रत्यारोप झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी खडसे यांच्यावर टिका केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT