महापालिकेसाठी मास्टरस्ट्रोक; शिवसेना उपनेतेपदी सुनील बागुल

नाशिक शहरात आता बबनराव घोलपांनतर सुनील बागुल ठरलेल दुसरे उपनेते
Shivsena Dy. Leader Sunil Bagul
Shivsena Dy. Leader Sunil BagulSarkarnama

सिडको : शिवसेनेच्या (Shivsena) उपनेतेपदी सुनील बागुल (Sunil Bagul) यांची काल सायंकाळी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका (NMC) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षाचा महत्त्वाचा निर्णय आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या मुहुर्ताला झालेल्या या नियुक्तीने भाजपचा एक नगरसेवक गळाला अशी स्थिती आहे.

Shivsena Dy. Leader Sunil Bagul
राज्यमंत्री पवारांच्या घरी निघालेल्या काँग्रेस आंदोलकांना अटक

श्री. बागुल हे नाशिकच्या उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे नाव आहे. सध्या ते श्रमिक सेना तसेच रिक्शा, टॅक्सी चालक युनियन व कामगार संघटनांचे नेतृत्व करीत आहे. पंचवटी परिसरातील रामवाडी भागातून त्यांच्या कुटुंबातील सदस्य सातत्याने महापालिकेत नगरसेवक आहे. भाजपच्या विद्यमान उपमहापौर भिकुबाई बागुल या त्यांच्या मातोश्री आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराचे अध्यक्ष शंभू बागुल त्यांचे चिरंजीव आहेत.

Shivsena Dy. Leader Sunil Bagul
भाजप नाशिक महापालिकेत लढणार स्वबळावर

त्यामुळे आज भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा आहे. हा दौरा प्रामुख्याने महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेच आहे. त्यामुळे या दौऱ्याच्या मुहुर्तावर भाजपचा किमान एक नगरसेवक गळाला हे नक्की. श्री. बागुल यांचे शहरातील राजकारणात महत्त्व आहे. त्यामुळे भाजपचे किती नगरसेवक शिवसेना गळाला लावते याची उत्सुकता आहे.

श्री. बागुल हे मुळे शिवसेनेचे आहेत. त्यांनी महानगरप्रमुख तसेच विविध पदांवर काम केले आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेचे उमेदवार राहिले आहेत. मध्यंतरी शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींमध्ये ते प्रवाहाबाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व त्यानंतर काही दिवस भाजपमध्ये काम केले. ते भाजपचे प्रदेश स्तरावरील पदाधिकारी होते. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता.

स्वगृही परतलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनिल बागुल यांची शिवसेनेच्या उपनेते पदी नियुक्ती करण्यात आल्याने शिवसेनेच्या विविध नेत्यांनी त्याचे स्वागत केले आहे. नाशिकला माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नंतर त्यांना हे पद मिळाले आहे. नाशिकमध्ये आता दोन उपनेते पद मिळाले आहे. त्यामुळे त्याचा पक्षाला महापालिका निवडणुकीसाठी कसा उपयोग होतो याची उत्सुकता आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com