DIG B. G> Shekhar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सरकारी जमिनीवर सुरु होती गांजाची शेती; साडेचार कोटींचे अमली पदार्थ हस्तगत

उत्तर महाराष्ट्रातील धुळे- नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ भागात गांजा हस्तगत करण्यात आला आहे.

Sampat Devgire

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील धुळे- नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ भागात गांजा हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यापैकी काही ठिकाणी वन विभागाच्या जमिनीवरच गांजाची शेती सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत साधारणतः चार कोटी ६० लाख ९४ हजारांचा हा मुद्देमाल असून, त्यात १६ जणांना अटक झाली.

पोलिसांनी उत्तर महाराष्ट्रातील अमली पदार्थ तस्कराविरोधात मोहीम तीव्र केली आहे. दीड महिन्यापासून विशेष पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. यात, ब्राउन शूगरचा ५०० ग्रॅम साठा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. आंतरराज्य मार्गावरील अंमली पदार्थाच्या तस्करीशिवाय उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गांजाची शेती सुरू असून, केवळ खासगी जागेवर नव्हे, तर काही भागात थेट वन विभागाच्या सरकारी जमिनीवर गांजाची शेती सुरू असल्याचे उघडकीस आल्याने वन विभागाची यंत्रणेचे कामकाज रडारवर आले आहे.

तीन शेतांवर कारवाई

नंदुरबार जिल्ह्यात तीन ठिकाणी गांजाची शेती असल्याचे पुढे आले. धडगाव तालुक्यात काही भागात कपाशीच्या शेतात गांजा लागवड केलेल्या नऊ जणांना अटक केली आहे. तोरणमाळ भागात असाच प्रकार उघडकीस आला. शिरपूर (धुळे) येथेही रॅकेटचा पदार्फाश करताना पोलिसांना वन विभागाच्या जमिनीवर गांजाच्या शेतीचा प्रकार आढळला. वन विभागाच्या जमिनीवर गांजा लागवडीच्या आरोपावरून पोलिसांनी पाच जणांना अटक करीत, कारवाई सुरू केली आहे.

अमली पदार्थांवर कारवाई

* पाच हजार १६५ रुपये प्रतिकिलो या भावाने ९३२ किलो गांजा जप्त चार कोटी २८ लाख २८ हजार

* मोहाडी (धुळे) येथे ५०० ग्रॅम ब्राउन शूगर जप्त सात लाख ५० हजार

* रमजानपुरा (नाशिक) ४८१ किलो चरस जप्त एक लाख ४४ हजार ३००

* दोन ठिकाणी शेतात गांजा लागवडीचा पदार्फाश

...

वनविभागाच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील जमिनीवरील गांजा शेतीचे प्रकार उघडकीस आले असून, त्यांच्या जमिनीवर वन विभागानेही लक्ष दिले पाहिजे. यासाठी वन विभागाला पत्र देऊन माहिती देणार आहोत. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत गांजा शेतीचे प्रकार उघडकीस आले आहे.

- डॉ. बी. जी. शेखर, विशेष पोलिस उपमहानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT