शरद पवारांविषयी अपशब्द भोवले; नवा गुन्हा दाखल, तुषार भोसलेंच्या विरोधात ६ नव्या तक्रारी

शरद पवार यांच्या विषयी अपशब्दाचा वापर करणाऱ्या तुषार भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल.
Tushar Bhosale & NCP youth wing workers
Tushar Bhosale & NCP youth wing workers Sarkarnama

नाशिक : भाजपच्या अद्यात्मिक आघाडीचे प्रमुख काल- परवा राजकारणात आलेत. भाजपचा अजेंडा म्हणून प्रत्येकाविषयी गरळ ओकत असतात. शरद पवारांविषयी अपशब्द उच्चारून त्यांनी परीसीमा गाठली. त्यामुळे शरद पवार, संस्कार आणि सभ्यता काय असते, हे त्यांना शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पुरषोत्तम कडलग यांनी दिला आहे.

Tushar Bhosale & NCP youth wing workers
शरद पवारांविषयी अपशब्द बोलणारे तुषार भोसले महिलांच्या धास्तीने पोलिस ठाण्यात दडले!

श्री. भोसले यांनी फेसबुकवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक विधान केल्यामुळे त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने येथील पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान वादग्रस्त विधाने करणारे भोसले आता चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी त्यांच्या विरोधात नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नाशिक तालुका, येवला, देवळा, चांदवड, मालेगाव ग्रामीण, आडगाव या सात पोलिस ठाण्यांत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काल शिष्टमंडळांसह तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

Tushar Bhosale & NCP youth wing workers
मी सुद्धा मराठी माणूसच ना, मग अडीच वर्ष कशाला ठेवलं?, तेव्हा कुठे होता मराठी माणूस?

काल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पुरषोत्तमम कडलग, तालुका अध्यक्ष गणेश गायधनी, विधानसभा अध्यक्ष तुषार खांडबहाले, विशाल गायकर, आकाश पिंगळे, राज पगार, माजी सरपंच दौलत निंबेकर, ऊमेश शिंदे आदींनी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. देशातील एका सन्माननीय व ज्येष्ठ नेत्याविषयी अतिशय बेजबाबदारपणे अवमानजनक भाषा व अपशब्दांचा वापर श्री. भोसले यांनी केला. ती त्यांची सवय व शैली आहे. यापूर्वीही त्यांनी राज्यातील नेते व सरकारबाबत अशीच विधाने केली आहेत. समाजात असंतोष निर्माण करणे व संबंधीत व्यक्तींची बदनामी हाच त्यांचा हेतू असतो. ते जाणीवपूर्वक हे सर्व करतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात कलम ४९९, ५००, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस निरीक्षक उपलब्ध नव्हते. सोमवारी याबाबत निर्णय होईल असे सांगतण्यात आले.

येवला येथे सहायक निरीक्षक नितीन खडागळे यांना कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. शहराध्यक्ष मुशरिफ शाह, उपाध्याक्ष गोटू मंजरे, रहमत शेख, राष्ट्रवादी ओबीसी शहराध्यक्ष सचिन सोनवणे, नानासाहेब शिंदे, राष्ट्रवादी सेवादल अध्यक्ष सुमित थोरात, नितिन जाधव, सरचिटणीस भूषण सूर्यवंशी, वाहिद अली आदी कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. पवार यांच्या आजारपणावर केलेले वक्तव्य निषेधार्थ असून कायदयाच्या चौकटीत गुन्हेगारी प्रकारचे असल्यामुळे अशा वक्तव्यामुळे पवार यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे समर्थकांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे भोसले यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात यावा असेही निवेदनातम म्हटले आहे. तुषार भोसले यांना संपूर्ण कल्पना असतानाही बदनामीकारक, राजकीय व सामाजिक प्रतिमा मलिन व्हावी या दृष्ट हेतूने व्यक्तव्य केलेले आहे. त्यामुळे भोसले यांच्याविरोधात कडक कारवाई करावी अन्यथा आंदोलन उभारले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com