Lalit Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Drug Mafia Lalit Patil : ड्रग्ज कारखान्यातून ललित पाटीलने १२ कोटी रुपये कमावले!

Drugs mafia Lalit Patil earns 12 cr from Nashik Drugs Foctory-नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ड्रग्ज माफीया ललित पाटील याचा सध्या तपास सुरू आहे.

Sampat Devgire

Drug Mafia Lalit Patil : बुहचर्चीत ड्रग्ज माफिया ललित पाटील (पानपाटील) याची कस्टडी सध्या नाशिक पोलिसांकडे आहे. पोलिसांनी याबाबत गेले तीन दिवसांपासून विविध दृष्टीकोणातून हा तपास केला आहे. त्यात त्यांना अतिशय धक्कादायक माहिती मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Nashik Police investigating Lalit Patil regarding Nashik Drug factory and crime)

शिंदे (नाशिक) (Nashik) येथील ड्रग्ज कारखान्यावर मुंबई (Mumbai) पोलिसांनी धाड टाकली होती. त्यानंतर याबाबत अन्य शहरांत देखील एमडी ड्रग्जच्या फॅक्टरी असल्याचे उघड झाले आहे. याबाबत सध्या नाशिक पोलिस (Police) ललित पाटील (पानपाटील) याची चौकशी करीत आहेत.

मौजे शिंदे (नाशिक) येथील एमडी ड्रग्ज कारखाना सुरू करून ललित पाटील याने १२ कोटी रुपये कमावल्याचे तपासात ,स्पष्ट झाले आहे. या पैश्यांत अनेकांची हिस्सेदारी होती. इतरांची हिस्सेदारी दिल्यानंतर ललितकडे राहिलेल्या पैशातून त्याने सोने-चांदी खरेदी केली होती. ससून रुग्णालयात राहत असताना त्याचा खर्चच लाखो रुपये असल्याचे ललितने पोलिसांना सांगितले.

चाकणच्या गुन्ह्यात गोवण्यात आल्यानंतर, एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात आलेल्या ललित पाटील याच्याच सांगण्यावरून त्याचा भाऊ भूषण याने शिंदेगावात एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना सुरू केला. एमडीच्या फार्मुल्यासाठी ललितच्या सांगण्यावरून अरविंद लोहारे व हरिश पंत यांनी भूषणला मदत केल्याचे दोन्ही भावांच्या समोरासमोरील चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

एमडी ड्रग्ज माफिया ललित पाटील व भूषण पाटील हे सध्या नाशिक शहर गुन्हेशाखेच्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून काही धक्कादायक माहिती नाशिक पोलिसांच्या हाती लागत आहेत. चाकणच्या एमडी प्रकरणात ललितचा प्रत्यक्ष सहभाग नसताना, संशयित लोहारे यांच्या संपर्कात असल्याने अटक झाला होता.

हरीश आणि जिशान यांच्याच नेतृत्वाखाली शिंदे गावात डिसेंबर २२ मध्ये पहिला कारखाना सुरू केला. त्यासाठी हरिषनेच कच्चा माल पुरवला. मात्र त्यांचा एमडी ड्रग्जचा पहिला लॉट रिजेक्ट झाला होता. त्यानंतर पुन्हा एमडी ड्रग्ज तयार करून त्याची तस्करी स्वत: हरीश व जिशान यांनी करीत त्याची विक्री पुणे, ठाणे आणि मुंबईत केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT