Nagpur Winter Session : रोहित पवारांच्या 'युवा संघर्ष'विरुद्ध नागपुरात गुन्हा दाखल

Rohit Pawar : पोलिसांचे कठडे तोडत विधान भवनाकडे जाण्याचा केला होता प्रयत्न
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेमधील कार्यकर्त्यांविरुद्ध नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीताबर्डी पोलिसांनी राष्ट्रवादीचे नागपूर अध्यक्ष दुनेश्वर पेठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा नोंदवला आहे. रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांनी विधान भवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला होता.

विधान भवनापासून काही अंतरावर असलेल्या मॉरिस कॉलेज टी-पॉइंटवरील 'झिरो माइल' चौकातील मोर्चा पॉईंटवर पोलिसांनी रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्यासह आंदोलकांना अडवले होते. प्रचंड घोषणाबाजी सुरू असताना दुनेश्वर पेठे व त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मोर्चा पॉईंटवर पोलिसांनी लावलेले लोखंडी कठडे तोडत विधान भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिस (Maharashtra Police) आणि आंदोलक यांच्यात प्रचंड झटापट झाली. सुमारे एक तासापर्यंत पोलिस आणि आंदोलन यांच्या संघर्ष सुरू होता. (Yuva Sangharsh Yatra)

MLA Rohit Pawar
Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत 17 तारखेला महत्वाची बैठक; जरांगे यांचे भुजबळांवर पुन्हा टीकास्त्र

मोर्चा पॉईंटवर निर्माण झालेल्या या तणावानंतर तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या प्रभारी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त कुमक मागवत आमदार रोहित पवार, सलील देशमुख, रोहित पाटील आणि दुनेश्वर पेठे यांच्यासह युवा संघर्ष यात्रेतील 67 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना दाभा गावाजवळ सायंकाळी मुक्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी मोर्चा पॉईंटवरील सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर दुनेश्वर पेठे व त्यांचे कार्यकर्ते यांनी विनाकारण आक्रमक भूमिका घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मोर्चा पॉईंटपासून काही अंतरावरच असलेल्या सीताबर्डी पोलिस ठाण्यात पेठे व त्यांच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तरुणाईच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेला सुरुवात केली होती. संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 800 किलोमीटरचा प्रवास करीत ही यात्रा 12 डिसेंबर रोजी नागपुरात पोहोचली. त्यानंतर यात्रेचे रूपांतर मोर्चामध्ये झाले. या मोर्चाचे नेतृत्व स्वतः आमदार रोहित पवार करीत होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख, रोहित पाटील हे देखील यावेळी मोर्चामध्ये होते. अशातच पोलिसांनी केवळ दुनेश्वर पेठे व त्यांच्या समर्थकांनी विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांच्यासह देशमुख आणि पाटील यांची नावे मात्र एफआयआरमध्ये नाहीत.

MLA Rohit Pawar
Ajit Pawar: 'पीएच.डी'वर दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अजितदादा म्हणाले, 'राजकीय नेत्यांवर पीएच.डी करणाऱ्या..'

गैरकायद्याची मंडळी जमवणे, पोलिसांनी उभारलेले कठडे तोडणे, मनाई आदेशांचे उल्लंघन करणे अशा स्वरूपाचे हे गुन्हे आहेत. मोर्चा पॉईंटवर तैनात असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत ममताबादे यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे सीताबर्डी पोलिसांनी सांगितले. यंदा नागपुरात राज्य विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर मोर्चातील आंदोलक एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनियंत्रित होण्याची ही पहिलीच घटना होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मोर्चानंतर आता पोलिसांनी झिरो माइल चौकातील मोर्चा पॉईंटवर कठड्यांची रचना दुहेरी केली आहे.

MLA Rohit Pawar
Pune News: पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, दिल्ली कनेक्शन; एकाला अटक

लाठ्या खाऊ, पण प्रश्न मांडू!

महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणाईचे प्रश्न मांडण्यासाठी आपण विधान भवनावर आलो होतो. परंतु पोलिसांनी बळाचा वापर केला. काही कार्यकर्त्यांना लाठ्यांनी मारहाणही करण्यात आली. पोलिसांनी आणि सरकारने कितीही दडपशाही केली, तरी आपण लाठ्या खाऊ, पण प्रश्न बेरोजगार तरुणाईचे आणि सर्वसामान्य जनतेचे मांडत राहू, असे आमदार रोहित पवार यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

(Edited By - Rajanand More)

MLA Rohit Pawar
MP Sanjay Patil: मंजुरी आधीच संजय पाटलांनी सांगितलं 'टेंभू'चे गुपित; बाबर अन् सुमनताई काय बोलणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com