Uddhav Thackeray & Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Drug Politics : ड्रग्ज प्रकरणावरून दोन्ही शिवसेनेत जोरदार जुंपली!

Sampat Devgire

Shivsena Nashik Politics : शहरातील ड्रग्ज प्रकरणावर शिवसेना उद्धव ठाकरे गट अत्यंत आक्रमक झाला आहे. त्यांनी येत्या शुक्रवारी मोर्चा काढण्याचे जाहीर केल्यामुळे सत्ताधारी पक्ष खडबडून जागा झाला आहे. यावर आता शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातच जुंपली आहे. (Administration & Police are get alert after Shivsena`s Warning)

शिवसेनेच्या (Shivsena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने येत्या २० ऑक्टोबरला मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. पोलिस (Police) आणि प्रशासनासह त्यांचा रोख थेट पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर असल्याने राजकारण तापले आहे.

या विषयावर राजकारण चांगलेच तापले आहे. आधी काँग्रेसने थेट पालकमंत्री तसेच भाजपच्या आमदाराचा उल्लेख करीत आरोप केला. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत नाशिकला येऊन गेले. त्यांनी ड्रग्जच्या विषयावर पक्षाच्या नेत्यांना आक्रमक होण्याचा सल्ला दिला.

सध्या या प्रकरणावर शिंदे गटाचे पदाधिकारीदेखील अॅक्शन मोडवर आले आहेत. याबाबत शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी शिवसेनेचा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांनी पालकमंत्र्यांवर आरोप केला. तो राजकारणाचा भाग आहे. त्यांच्याकडे काहीही पुरावा नाही. असेल तर त्यांनी दिला पाहिजे. खरे कर या प्रकरणातील फरारी आरोपी ललित पाटील हा शिवसेनेत होता. अद्यापही तो शिवसेनेतच आहे. त्याला काढल्याचा पुरावा शिवसेनेने द्यावा, असे आव्हान दिले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यावर थेट सत्ताधारी नेते, राज्य सरकार व पोलिसांवर आरोप करीत आहेत. त्यामुळे शहराचे राजकारण चांगलेच तापले आहे. प्रत्येकाने मोर्चा काढण्याचा इशारा दिला. त्यामुळे जाता जाता शिंदे गटानेही आम्हीदेखील मोर्चा काढू शकतो, असे सांगून आक्रमक होण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये येत्या शुक्रवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाने शक्तिप्रदर्शनाची तयारी केलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT