Rohit Pawar News: 'झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी युवा संघर्ष यात्रा'; रोहित पवारांचा निशाणा

Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra : युवा संघर्ष यात्रा का काढण्यात येणार आहे, आमदार रोहित पवार यांनी सांगितले कारण...
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News: राष्ट्रवादीमधील फुटीनंतर पक्षाच्या मोर्चेबांधणीसाठी आमदार रोहित पवारांनी राज्यभर दौरा करत पक्ष संघटनेचा आढावा घेतला. त्यानंतर आता रोहित पवारांनी युवकांच्या प्रश्नांना हात घालत युवा संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पुणे ते नागपूर अशी 800 किलोमीटरची ही पदयात्रा असून, 13 जिल्ह्यातून प्रवास करणार आहे.

या यात्रेत युवकांचे प्रश्न मांडण्यात येणार असून, सरकारने कंत्राटी भरतीसंदर्भात काढलेले जीआर, पेपरफुटीसह आदी प्रश्नांवर या यात्रेत विचारमंथन करण्यात येणार आहे. दसऱ्यानंतर (विजयादशमी) पुण्यातून या यात्रेला सुरुवात होणार असून, 45 दिवसांचा प्रवास करत 7 डिसेंबरला नागपूरला पोहाेचणार आहे. या पार्श्वभूमीवरच आमदार रोहित पवार मंगळवारी पिंपरीत बोलत होते. या वेळी त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rohit Pawar
MLA Rohit Pawar: रोहित पवारांचे पिंपरी-चिंचवडमध्ये 'सोशल इंजिनिअरिंग'; भाजपविरोधी ताकद एकजूट करण्याचा प्रयत्न

"राज्य सरकारने झोपेचे सोंग घेतले असून, ही युवा संघर्ष यात्रा सरकारला जागे करण्यासाठीच आहे, युवकांच्या प्रश्नासाठी लढणं आपल्या हातात आहे, पण या सरकारला जनतेचे प्रश्न सोडविण्यात रस नाही", अशी खोचक टीका रोहित पवारांनी केली.

या बरोबरच पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांना घाबरविले जात असेल म्हणून ते तिकडे गेले, पण लोकहितासाठी आपल्याकडे येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

युवा संघर्ष यात्रेचा उद्धेश काय ?

"युवकांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही पदयात्रा असून, युवा पिढीच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांना भविष्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून युवकांनी सुरू केलेली ही एक चळवळ आहे."

"राज्यात सध्या बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे कंत्राटी पदभरती सरकार करत आहे, तर कुठे पेपरफुटीचे प्रकार उघडकीस येत आहेत, परीक्षांवर सरकार अवाजवी परीक्षा शुल्क घेत आहे, अशा अनेक मुद्द्यांवर या यात्रेच्या माध्यमातून प्रश्न मांडण्यात येणार आहेत", असे रोहित पवार म्हणाले.

Edited by : Ganesh Thombare

Rohit Pawar
Congress News : काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली; नियोजित दौरा रद्द करत नाना पटोले तातडीने हायकमांडच्या भेटीला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com