Shivsena UBT News : शिबिरासाठी स्वतःच्या खिशातून औषधी खरेदी करा, सरकारी लूट कशाला ?

Tanaji Sawant News : एकीकडे राज्य सरकार दमडीचीही औषधी खरेदी करत नाही, दुसरीकडे आपल्याच यंत्रणेची अशी 'सरकारी लूट' केली जाते आहे.
Shivsena UBT News
Shivsena UBT News Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राज्य सरकारकडून विविध जिल्ह्यांमध्ये महाआरोग्य शिबिर आयोजित केली जात आहेत. विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदार, मंत्र्यांच्या मतदारसंघात ती होत आहेत. (Health Camp News) राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून तुळजापूर येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

Shivsena UBT News
BJP MLA Nitesh Rane News : अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद जाणार, नीतेश राणेंचा दावा...

पण हे शिबिर वादात सापडले आहे ते बाहेरील शासकीय रुग्णालयातील औषधी तुळजापूरच्या शिबिरासाठी मागवल्यामुळे. (Shivsena) येत्या २७ ते २९ आॅक्टोबर दरम्यान, तुळजापुरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इतर सरकारी रुग्णालयांमधून या शिबिरात औषधी पुरवण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खरमरीत टीका केली आहे.

या संदर्भात दानवे यांनी `एक्स`वर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त करत ही सरकारी लूट असल्याचे म्हटले आहे. (Marathwada) आरोग्य यंत्रणा अजून किती पांगळी करणार आहात? तुळजापुरात महाआरोग्य शिबिर घेत आहात आणि त्यासाठी संपूर्ण राज्यातील सरकारी दवाखान्यातून औषधी तुळजापुरात मागवत आहात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे राज्य सरकार दमडीचीही औषधी खरेदी करत नाही, दुसरीकडे आपल्याच यंत्रणेची अशी 'सरकारी लूट' केली जाते आहे. हा त्या-त्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर अन्याय आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी केलेली औषधी ही त्यांनी तुळजापूरला का म्हणून पाठवावी? शिबिर घ्यायचे असेल तर स्वतंत्र औषधी खरेदी करता येऊ शकते, असे म्हणत दानवे यांनी आरोग्यमंत्री सावंत यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सव १३ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. महोत्सवाला राज्यासह विविध राज्यांतून भाविक व पायी यात्रेकरू चालत तुळजापूर शहरात विविध मार्गांनी दाखल होत आहेत. भाविक व यात्रेकरूंना या काळात आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागाची विविध पथके काम करीत आहेत. आतापर्यंत दहा हजार भाविक व यात्रेकरू रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. तुळजापूरकडे येणाऱ्या मार्गावर १९ आरोग्य पथके २४ तास कार्यरत आहेत. एक समुदाय आरोग्य अधिकारी व एक आरोग्य कर्मचारी आवश्यक औषध साठ्यासह सेवा देत आहेत. साथरोग प्रतिबंधात्मक पथके १० ग्रामीण मार्गावर आणि १० शहरी भागात नियुक्त करण्यात आले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com