Dada bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon News : मतदारसंघाताल दुष्काळाने पालकमंत्री दादा भुसे अडचणीत?

Sampat Devgire

NCP Malegaon News : रोज नव्या नव्या व कोटींच्या घोषणा करणारे राज्य शासन व त्यांचे मंत्री त्यांच्याच मतदारसंघात अडचणीत येत असल्याचे चित्र आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात तीव्र दुष्काळ आहे, मात्र शेतकरी, नागरिकांना काहीही दिलासा न मिळाल्याने पालकमंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. (NCP deemands immidiate relief for farmers due to drought in Malegaon)

नुकतेच सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) (अजितदादा पवार) याबाबत शासनाला (Maharashtra Government) निवेदन देत मदतीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचा हा मतदारसंघ आहे.

पावसाळा सुरु होऊन अडीच महिने उलटले तरीदेखील जिल्ह्यासह तालुक्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. रिमझिम पावसाच्या भरवशावर करण्यात आलेल्या पेरण्या वाया जाण्याची चिन्हे दिसत असून शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. पालकमंत्री भुसे यांच्या मतदारसंघातील हे चित्र आहे.

माळमाथा, काटवन या भागात काही गावांना आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शासनाने मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) डॉ. जयंत पवार यांनी केली आहे. डॉ. पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठविले आहे.

मालेगाव शहरासह तालुक्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने पाठ फिरविल्यामुळे त्याचा सर्व घटकांवर परिणाम होत आहे. तालुक्यात शेती हेच प्रमुख उदरनिर्वाहाचे साधन आहे. मागीलवर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. या वर्षी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत देखील समाधानकारक पाऊस झाला नाही.

पुरपाणी शेतीला मिळावे

सध्या गिरणा नदीला पुरपाणी आले आहे. काही दिवसापासून कमी प्रमाणात का होईना नदीतून पाणी वाहत आहे. गिरणेचे पूरपाणी उजव्या व डाव्या कालव्याद्वारे शेतीला देवून पिके वाचावीत. पुरपाणी शेतीला मिळाल्यास पिकांना जीवदान मिळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT