ST Bus Service Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ST Bus News : मराठा आंदोलनाचा 'लालपरी'ला फटका ; नगर विभागाच्या ९० बस फेऱ्या रद्द, पाच लाखांचे उत्पन्न बुडाले!

Mayur Ratnaparkhe

प्रदीप पेंढारे -

Maratha Reservation :  मराठा आरक्षणाचे आंदोलन मराठवाड्यात चांगलेच पेटले आहे. राजकीय नेत्यांची घरं आणि कार्यालये पेटवून देण्यात येत आहेते. यामुळे एसटी महामंडळाच्या नगर विभागातील 90 हून अधिक बस फेऱ्या आज दिवसभरात रद्द झाल्या. परिणामी नगर विभागाचे सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती नगर विभाग कार्यालयाकडून देण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एसटी महामंडळाच्या नगर विभागातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्या गेल्या दोन दिवसांपासून कमी करण्यात आल्या आहेत. आज मराठवाड्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन चांगलेच पेटले आहे. राजकीय नेते, आमदारांचे घरे, पक्ष कार्यालय पेटवून देण्यात आली आहेत. यामुळे आज दिवसभरात नगर विभागाच्या बसच्या ९०हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

यामुळे सुमारे १६ हजार किलोमीटर बस कमी धावल्यात. परिणामी नगर विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न आजच्या दिवसाचे बुडाले आहे.

मराठवाड्यातील प्रशासन प्रमुखांकडून सूचना येईपर्यंत नगर विभागातील बसच्या फेऱ्या रद्द राहतील. सकल मराठा समाज उद्यापासून आंदोलन आणखी तीव्र करत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या नगर विभागाने मराठवाड्यात बस सोडण्याचे सावधपणे नियोजन केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT