Karjat-Jamkhed MIDC Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics: कर्जत-जामखेड एमआयडीसी मागणीचे पडसाद थेट मोदींच्या दौऱ्यात; युवकांनी फलक झळकावले

PM Modi visit In Pune: कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या मंजुरीसाठी युवकांचाही पुढाकार

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : कर्जत-जामखेड मतदारसंघात युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी दोन्ही तालुक्याच्या मध्यवर्ती सीमेवर असलेल्या कर्जत तालुक्यातील पाटेगाव-खंडाळा या ठिकाणी नियोजित एमआयडीसी प्रस्तावित असून त्यासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी यापूर्वीच पूर्ण झालेल्या असतानाही सरकार आमदार रोहित पवारांना वेळोवेळी आश्वासन देऊनही पाळत नसल्याबद्दल सध्याचे पावसाळी अधिवेशन गाजत आहे. या प्रश्नाचे पडसाद मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यानही दिसून आले.

कर्जत-जामखेडमधील सुशिक्षित युवांनी पंतप्रधानांचा ताफा जाणाऱ्या रस्त्यावर फलक फडकावत पंतप्रधानांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात कर्जत-जामखेड एमआयडीसी मंजुरीचे फलक फडकावत कर्जत तालुक्यात होऊ घातलेल्या एमआयडीसी मंजुरीचा मुद्दा आता थेट केंद्रीय पातळीवर नेला असे बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या पुणे दौऱ्यात कर्जत जामखेड एमआयडीसी मंजुरी रखडल्याबाबतचे फलक कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवकांनी झळकावल्याने सध्या कर्जत-जामखेड एमआयडीसीचा मुद्दा केंद्रीय पातळीवर गेल्याचं पाहायला मिळत असून या फलकांनीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सदरील फलकांवर "आदरणीय मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र शासन हे कर्जत-जामखेड येथील एमआयडीसी संदर्भात वेळकाढूपणा करत आहे. आपण देशाचे मोठे नेते आहात युवकांचा विचार करून एमआयडीसी संदर्भात तातडीने योग्य निर्देश देऊन मान्यता द्यावी ही विनंती, सर्वसामान्य युवक (कर्जत-जामखेड)" असा मजकूर फलकावर होता.

एकीकडे राज्य सरकार कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीला अधिसूचना काढून मंजुरी देत नसल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला असताना त्याचवेळी याच मुद्यावर पंतप्रधान मोदींनाच या एमआयडीसीच्या मंजुरीबाबतची विनंती केल्याने एकच चर्चा रंगली आहे. पंतप्रधान मोदींनाच कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवकांनी मंजुरीसाठी साकडे घातल्याने मतदारसंघात याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT