Shirur Election : ‘पोपटराव साहेबांचे, तर बाबूराव (दादांचे) माझे उमेदवार, असा त्या निवडणुकीत प्रचार झाला’; अजितदादांनी सांगितला किस्सा

Assembly election : पोपटराव गावडे यांना केवळ ६७८ मतांनी विजय मिळवता आला होता.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

Shirur News : विधानसभेच्या १९९५ च्या निवडणुकीत शिरूरमध्ये आमदारकीसाठी पोपटराव गावडे आणि बाबूराव पाचर्णे यांच्यात तुल्यबळ लढाई झाली. त्या निवडणुकीत पोपटराव गावडे हे साहेबांचे (शरद पवार), तर बाबूराव पाचर्णे हे दादांचे (अजित पवार) म्हणजे माझे उमेदवार असा प्रचार झाला. पण, मी आणि साहेब काय वेगळे आहोत काय? आम्ही त्यावेळीही वेगळे नव्हतो आणि आजही नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar told the story of Shirur Assembly elections in 1995)

शिरूरचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे (Baburao pacharne) यांचे गतवर्षी निधन झाले. त्यांच्या मूळगावी तर्डोबाची वाडी येथील शिवतारा पर्यटन परिसरात त्यांचे 'शक्तिस्थळ' या नावाने स्मारक उभारण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते या स्मारकाचे आज लोकार्पण झाले. त्या कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी पाचर्णे यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला.

Ajit Pawar
Modi Discussion with NCP Leader : मोदींनी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्याला जवळ बोलावून केली चर्चा!

विधानसभेच्या १९९५ च्या निवडणुकीची आठवण सांगताना अजितदादा म्हणाले की, शिरूर विधानसभेची निवडणूक त्यावेळी चुरशीची झाली होती. त्या निवडणुकीत कॉंग्रेसची उमेदवारी पोपटराव गावडे यांना मिळाल्यानंतर बाबूराव पाचर्णे यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढविली होती. ऐन निवडणुकीच्या आखाड्यात, पोपटराव हे साहेबांचे, तर बाबूराव हे दादांचे उमेदवार आहेत, असा प्रचार झाला.

Ajit Pawar
Sharad Pawar Called Meeting MVA : शरद पवारांनी पुन्हा टायमिंग साधलं; महाविकास आघाडीची बोलावली बैठक

त्या निवडणुकीच्या प्रचारात मी लोकांना म्हटलो की, साहेब आणि मी काय वेगळे आहोत का. पण तरीही लोकांनी पाचर्णे यांना माझा उमेदवार म्हणून ताकद दिली होती. त्यामुळे पोपटराव गावडे यांना केवळ ६७८ मतांनी विजय मिळवता आला होता. पण मी आताही स्पष्ट सांगतो की, पवार साहेब आणि मी तेव्हाही वेगळे नव्हतो आणि आताही नाही. त्याबाबत कुणीही कसलीही काळजी करण्याचे कारण नाही, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Sharad Pawar Greets PM Modi : व्यासपीठावर पोचताच शरद पवार अन॒ नरेंद्र मोदी रमले हास्यविनोदात...

विधानसभेची १९९५ ची ती निवडणूक चुरशीची झाली. पण कुणीही कटूता ठेवली नाही. निवडणुका झाल्यानंतर खेळीमेळीचे वातावरण ठेवायचे ही शिरूर तालुक्याची परंपरा आहे. ते काम आणि निवडणुकीनंतर एकत्र येऊन गुण्यागोविंदाने काम करण्याची परंपरा पोपटराव व बाबूराव यांनी जपल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

Ajit Pawar
Modi Pune Visit : टिळक-सावरकर नात्यावर मोदींचे भाष्य; ‘टिळकांनी सावरकरांची ब्रिटनमधील शिष्यवृत्तीसाठी शिफारस केली होती'

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल बाबूराव पाचर्णे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी बाबूराव पाचर्णे यांचे स्मारक उभारण्यामागील भूमिका प्रास्तविकात विशद केली. संजय बारवकर यांनी सूत्रसंचालन केले. भाजपचे शिरूर शहर अध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी आभार मानले. बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती, मुलगी राणीताई व जावई कर्नल महेश शेळके यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com