OBC Reservation: राज्यातील 92 नगरपालिकांच्या ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट

Supreme Court: ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष
OBC Reservation, Supreme Court
OBC Reservation, Supreme Court Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: महाराष्ट्रातील 92 नगरपालिका संदर्भातील सुप्रीम कोर्टात होणारी महत्वाची सुनावणी मंगळवारी पुन्हा पुढे ढकलली आहे. इतर मोठी प्रकरणं सुनावणीसाठी असल्यामुळे आज या प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नाही.

गेल्या एक वर्षापासून राजकीय ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून राज्यातील 15 महानगरपालिका, 92 नगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. या प्रकरणाच्या सुनावणीला अनेकदा तारीख पे तारीख मिळत असल्याने आता या संदर्भातील पुढची सुनावणी कधी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

OBC Reservation, Supreme Court
Shirur Election : ‘पोपटराव साहेबांचे, तर बाबूराव (दादांचे) माझे उमेदवार, असा त्या निवडणुकीत प्रचार झाला’; अजितदादांनी सांगितला किस्सा

राज्यातील 92 नगरपालिका आणि जवळपास 15 महानगरपालिकांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षण व बदललेल्या प्रभाग रचनेमुळे कोर्टाच्या कचाट्यात अडकल्या असून या निवडणुकांचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे. अनेक दिवसांपासून ही सुनावणी प्रलंबित असून वारंवार तारखा पुढे ढकलत असल्याने निवडणुकांचं भवितव्य अंधारात दिसून येत आहे.

OBC Reservation, Supreme Court
Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवारांसमोर जाताच अजितदादांनी आपली वाट बदलली; मोदींच्या व्यासपीठावर नेमकं काय झालं ?

सुप्रीम कोर्टात आज फक्त मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड रचने संदर्भातील सुनावणी झाली. पण या सुनावणीतही राज्य सरकारने पुन्हा तीन आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला. त्यामुळे यासंदर्भातील काही निर्णय होऊ शकला नाही. आता पुढची सुनावणी कधी होणार, आणि होणाऱ्या सुनावणीत तरी हा मुद्द मार्गी लागणार का?, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com