Dy CM Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NDCC Bank News : जिल्हा बँक वाचविण्यासाठी अजित पवारांनी कोणता कानमंत्र दिला?

Dy. CM Ajit Pawar says everyone have to help for Bank-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अडचणीतील जिल्हा बँक वाचविण्यासाठी नेत्यांना दिला महत्त्वाचा सल्ला

Sampat Devgire

Ajit Pawar News : नाशिकच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक अडचणीत आहे. त्याबाबत विविध नेत्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. (Ajit Pawar said, take strong decisions to save NDCC Bank)

नाशिक (Nashik) जिल्हा बँकेसाठी राज्य (Maharashtra) सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली होती. यासंदर्भात बँकेला राज्य शासनाने मदत करावी, यासाठी काही नेत्यांनी पवार यांच्याशी चर्चा केली.

या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी काही सूचना केल्या. त्यांनी जिल्हा बँक वाचवायचा फॉर्म्युलाच दिला. ते म्हणाले, जिल्हा बँक वाचवायची असेल, तर कठोर निर्णय घ्या. त्यासाठी सगळ्यांचे सहकार्य लागेल. विशेषतः प्रशासनाने बारीक अभ्यास करून आर्थिक काटकसरीला प्राधान्य द्यावे.

या वेळी त्यांनी आपला स्वतःचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, अर्थ, सहकार विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंबंधी चुकांची पुनर्रावृत्ती न करता कठोर निर्णय घ्यावे लागतील.

उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, मी वयाच्या १८ वर्षांचा असताना वडिलांचे निधन झाल्यावर ४० हजार रुपयांचे कर्ज माझ्याकडे आले. त्यामुळे कर्ज फिटत नाही. एकरकमी तडजोड होऊ शकते म्हणून कर्ज परत करावे लागेल. मोठ्यांनासुद्धा कर्ज परत करावे लागेल. त्यातून बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT