AIMIM, Janta dal & Congress Politics : जनता दल नेते एच. डी. देवेगौडा यांनी कर्नाटकात भाजपशी सख्य केले. मात्र, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. मालेगाव शहरातील हा पक्ष विसर्जित झाला. आता या पक्षाचे नेते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालेगावचे जोरदार कमबॅक होण्याची चिन्हे आहेत. (Congress is only secular party potion for AIMIM & Janta Dal in Malegaon)
मालेगाव (Malegaon) शहरात एमआयएम (AIMIM) आणि जनता दल (निधर्मी) (Janta Dal) या दोन्ही पक्षांची स्थिती भक्कम आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षाचे नेते काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जाते.
या संदर्भात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे आणि जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी जनता दलाच्या नेत्या शान-ए-हिद निहाल अहमद यांची भेट घेऊन त्यांना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले. जनता दल (सेक्युलर) पक्षाने कर्नाटकात भाजपच्या `एनडीए`शी युती केली होती. जनता दल पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याने या निर्णयानंतर मालेगावच्या जिल्हा अध्यक्षा शान-ए-हिद निहाल अहमद यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसह पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार अशी उत्सुकता होती.
अशीच काहीशी स्थिती ‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुफ्ती यांची झाली आहे. सर्वच मुख्य प्रवाहातील पक्षांसाठी ‘एमआयएम’ हा पक्ष अस्पृष्य मानला जातो. त्यांच्याशी कोणीही संपर्क ठेवत नाही. भाजपची ‘बी’ टीम असा शिक्का असल्याने आमदार असूनही मौलाना मुफ्ती यांना शहरासाठी फारसे काही करता आलेले नाही. त्यामुळे त्यांचे विश्वासू सहकारी, नगरसेवक एजाज बेग यापूर्वीच काँग्रेस पक्षात गेले आहेत. ते सध्या शहराध्यक्ष आहेत.
आमदार मौलाना मुफ्ती तसेच शान-ए-हिंद निहाल अहमद यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार रशीद शेख, त्यांची पत्नी माजी महापौर शेख व त्यांचे चिरंजीव माजी आमदार आसिफ शेख हे सध्या काँग्रेसचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेले आहेत. अशा स्थितीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना काँग्रेस ही पहिली पसंती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट हेदेखील धर्मनिरपेक्ष असल्याने त्या दिशेने पावले पडत आहेत. या स्थितीत आगामी लोकसभा, महापालिका व विधानसभा या तिन्ही निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाचे मालेगाव शहरात जोरदार कमबॅक होण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.