Devendra Fadanvis News : पश्चीम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी एक लाख कोटी निधीची गरज आहे. त्यासाठी तरतूद करण्याचे काम आम्ही कीरत आहोत. त्यातून गोदावरी खोरे कायमचे दुष्काळमुक्त तर करूच मात्र नाशिक, नगर आणि औरंगाबाद या विभागांतील पाण्यावरून होणारा वाद देखील कायमचा सोडवू, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Maharashtra Government will handle all issues of Nashik regions devolopment)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्या उपस्थितीत शासन तुमच्या दारी हा कार्यक्रम नाशिकला (Nashik) झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राबविला जात आहे. यानिमित्ताने शासन जनतेपर्यंत पोहोचत आहे. मात्र तरीही काही लोकांना हा कार्यक्रम कशाला? असा प्रश्न करून त्यांना पोटदुखी झाली आहे. मात्र त्यांच्या पोटदुखीवर औषध देण्यासाठी आम्ही डॉ. एकनाथ शिंदे यांना आणले आहेत. त्याने उपाय झाला नाही, तर अजित दादा देखील आहेत. त्या औषधाने ती पोटदुखी नक्की थांबेल.
ते म्हणाले, यापुर्वीचे मुख्यमंत्री सांगायचे की, मला सहकारातील काही कळत नाही. ग्रामीण भागाचे काही कळत नाही. त्यानंतर शरद पवार यांनी पुस्तक लिहून त्यांना राजकारणातलेच काही कळत नाही, हे त्यात सांगितले. लोकांनी देखील त्यांना योग्य जागा दाखवली आहे. आमचे दोन इंजिनचे सरकार होते. आता त्यात अजितदादांचे तीसरे इंजिन आले आहे. त्यामुळे हे सरकार अतिशय दमदार काम करून जनतेचे प्रश्न सोडवेल.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हा कार्यक्रम केवळ शासन तुमच्या दारी नसून, शासन श्रीरामाच्या दारी असा आहे. नाशिक जिल्ह्यातील नागरिकांचे अनेक प्रश्न यातून सुटणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याचे रिंग रोड, विविध विकासाची कामे, नीओ मेट्रोचा प्रकल्प, पाण्याचा प्रश्न सगळ्यांवर काम होत आहे.
ते पुढे म्हणाले, या भागात पडणारे पाणी पश्चिमेला वाहून जाते. ते अडविण्याची गरज आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्याला मंजूरी दिली आहे. त्यासाठी लागणारा एक लाख कोटींचा निधी आम्ही उपलब्ध करू. गोदावरी खोरे कायमचे दुष्काळमुक्त करूच, मात्र नाशिक, नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांत होणारा पाण्याचा वाद देखील कायमचा सोडवू.
नार-पार, तापी पुर्नभरण यांसारखा प्रकल्प तयार करावा लागेल. हे सगळं पाणी जेव्हा आपण आटवू आणि तुटीचे गोदावरी, तापीचे खोऱ्यात जेव्हा पाणी येईल तेव्हा आमच्या शेतकऱ्याला वर डोळे लावून पहावे लागणार नाही.
यावेळी छगन भुजबळ, गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, अनील पाटील, खासदार हेमंत गोडसे, आमदार डॉ. राहूल आहेर, राहूल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार, सरोज अहिरे, मौलाना मुफ्ती, हिरामण खोसकर यांसह विविध आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.