Niphad Dryport News : जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीटी) "सागरमाला" उपक्रमांतर्गत नाशिक (इनलँड कंटेनर डेपो) येथे ड्राय पोर्टचा विकास हाती घेतला आहे. गेली आठ वर्षे रखडलेल्या निफाडच्या या ड्राय पोर्टसाठी जमीन खरेदीच्या सूचना आता दिल्या आहेत. (JNPT will purchase a land of Niphad Sugar factory for dry Port)
देशांतर्गत कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक सुविधा प्रदान करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील (Maharashtra) वाहतुकीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, जेएनपी़टी (JNPT) व्यवस्थापनाने नाशिक (Nashik) जिल्ह्यात ड्राय पोर्ट विकसित करण्याचा प्रस्ताव होता. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी त्यासाठी पाठपुरावा केल्याचे सांगितले.
याबाबत केंद्रीय शिपींग व पोर्ट मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या दिल्ली येथील दालनात मंत्री डॅा. भारती पवार यांनी नियोजित ड्राय पोर्ट बाबत जमीन हस्तांतरणाचे कार्यवाही होणेसाठी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी नाशिक यांनी निर्देश देण्यात आल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
नाशिक विभागातून कृषी उत्पादन, द्राक्षे, कांदा, डाळिंब, निर्जलित कांदे, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, बांधकाम यंत्रे, ऑटोमोबाईल्स आणि औषधी उत्पादने इत्यादींची प्रचंड निर्यात विचारात घेऊन ड्राय पोर्ट/एमएमएलपीचा विकास प्रस्तावित करण्यात आला. तदनंतर दिल्ली च्या वरीष्ठ अधिकारी यांनी निफाड येथील नियोजित जागेची पाहणी देखील केला होती. जागेच्या सातबारा बाबत नोंदीमधील जीएसटी व इतर बोजा कमी करुन सातबारा केंद्र सरकारला सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी नाशिक यांना मंत्री पवार यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार निफाड साखर कारखान्याची नियोजित जमीन खरेदी करायची आहे जी ड्राय पोर्ट विकासासाठी सुचविण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा प्रस्ताव भारमुक्त जमिनीच्या हस्तांतरणाची रक्कम कळविली होती. निफाड कारखान्याच्या मालकिची जमीन कनेक्टिव्हिटीसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त खाजगी जमिनीच्या संपादनाची प्रक्रीया देखील होईल.
या संदर्भात, सदर भूसंपादन खर्च जमा करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बँक तपशीलाची माहीती जेएनपीए कडुन मागविण्यात आली आहे जेणेकरून भूसंपादन प्राधान्याने पूर्ण करता येईल.
एकदा भूसंपादनाची किंमत जमा झाल्यानंतर, नियोजित क्षेत्र जेएनपीएकडे हस्तांतरित करणे आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त खाजगी जमिनीसाठी संपादन प्रक्रिया सुरू करण्याचे निर्दोशही देण्यात आले असल्याची माहीती डॅा. पवार यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.