Eknath Khadse & Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse News : खडसे यांनी लावले देवेंद्र फडणवीसांचे `ते` व्हिडीओ!

Dy. CM Devendra Fadanvis is now fooling the Maratha community-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकही आश्वासन पूर्ण करीत नाही, आता मराठा समाजाला मुर्ख बनवत आहे.

Sampat Devgire

Eknath Khadse on Devendra Fadanvis : मनसे नेते राज ठाकरे यांचा कित्ता गिरवत एकनाथ खडसे यांनी काल जळगाव येथे झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांचे चागंलेच वस्त्रहरण केले. फडणवीस यांनी `व्हिडीओ`मध्ये दाखविलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही, असे खडसे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या राजकीय भूमिकेवर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी खडसे (Eknath Khadse) यांनी थेट फडणवीस यांचा समाचार घेत त्यांच्या मर्मावर बोट ठेवले.

यावेळी खडसे यांनी राज्य सरकारचे धोरण आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी फडणवीसांच्या फसव्या घोषणांतील फोलपणा दाखविण्यासाठी सहकाऱ्यांना `लाव रे तो व्हिडीओ` म्हणत सभेत फढणवीस यांनी केलेल्या विविध घोषणांचे व्हिडीओ दाखविले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागील वक्तव्याचा व्हीडीओ दाखविला. विदर्भ वेगळा केल्याशिवाय लग्न करणार नाही, अजित पवारसोबत घेणार नाही, सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारावर कारवाई करून चक्की पिसींग करायला लावीन असे त्यांचे वक्तव्य होते. यावर श्री. खडसे म्हणाले, यातील एकही आश्‍वासन त्यांनी पूर्ण केले नाही. आता मराठा समाजालाही ते आश्‍वासन देत आहेत. ते सुद्धा पूर्ण करणार नाहीत. त्यांनी मराठा समाजाला मुर्ख बनवू नये असे अवाहनही त्यांनी केले.

यावेळी खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही चागंलाच समाचार घेतला. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार स्वाभिमानी असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आज त्यांची प्रत्येक फाईल देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेतून जात आहे. त्यामुळे त्यांनी आपला स्वाभिमान कुठे ठेवला? असे विचारण्याची वेळ आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT