Beed Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असणाऱ्या आंदोलनादरम्यान जालना जिल्ह्यात आंदोलक आणि पोलिसांमध्ये लाठीचार्ज आणि दगडफेक झाल्याचा आपण सर्वांनीच पाहिले. ही घटना अजून ताजी असतानाच बीडमध्ये मात्र परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली तर हे चित्रही बदलू शकत ! असंच काहीसं बीड पोलिसांनी करून दाखवलं.
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंदोलनाच्या समर्थनार्थ बीडच्या गुळज गावातही मराठा बांधवांनी आंदोलन केलं. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला. आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलं आणि पोलिसांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. मात्र हे दोन्ही संपल्यानंतर गुळज येथील मराठा आंदोलकांनी पोलिसांचा चांगलाच पाहुणचार केला. आंदोलनानंतर आंदोलकांनी पोलिसांसाठी दाळबाटीची मेजवानी दिली. त्यामुळे एकीकडे आंदोलन आणि पोलीस भिडल्याचे चित्र असताना दुसरीकडे मात्र आंदोलकांकडून पोलिसांचा पाहुचार केल्याची चर्चा आता जोरदार सुरू आहे..
दरम्यान, बीड जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व समन्वयकांसोबत त्याचबरोबर, सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी वेळोवेळी संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे ज्या भागात आंदोलने होत आहेत त्या भागात बैठकाही घेत आहेत.पोलीस आणि आंदोलकांच्या समन्वयामुळे सध्यातरी बीड जिल्ह्यात शांततेत आंदोलने होत आहेत.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडकरही सरसावले आहेत.त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून हे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र आज तलाठी व इतर परिक्षा असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी उद्यापासून हे आंदोलन सुरू होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.