Eknath Shinde & Tanaji Sawant : मुख्यमंत्री शिंदेंचा तानाजी सावंतांना 'जोर का झटका'; आरोग्य विभागातील 'या' दोन अधिकाऱ्यांची काही महिन्यांतच उचलबांगडी

PMC - Pune Jilha Parishad News : '' ...हे प्रकरण भोवल्याची पालिका वर्तुळात चर्चा!''
Eknath Shinde & Tanaji Sawant
Eknath Shinde & Tanaji Sawant Sarkarnama

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मर्जी ओलांडून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख आणि पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारीपदी दोन अधिकाऱ्यांना आणले होते. आरोग्यमंत्री सावंतांचीच मर्जी असल्याने या दोन्ही अधिकाऱ्यांनी महापालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्रशासन यंत्रणेच्या अक्षरश: नाकीनऊ आणल्याची देखील जोरदार चर्चा गेले काही दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू होती. त्यांच्याविरोधातल्या तक्रारी थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्या होत्या.

याच तक्रारींची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना जोर का झटका देत पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुखपदासह जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करत त्यांना मुंबईला धाडले आहे. या बदलीमागे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा देखील छुपा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Eknath Shinde & Tanaji Sawant
CMO Dummy OSD News : मुख्यमंत्री शिंदेंसह अधिकाऱ्यांनाही 'या' ठाकरेंचा चकवा; डमी 'ओएसडी' होऊन हाकला CMO चा कारभार !

पुणे महानगरपालिका आरोग्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान पवार आणि पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांची मंगळवारी बदली करण्यात आली आहे. एकाच वेळी दोन महत्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांची बदली झाल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. भगवान पवार यांची सहायक संचालक आरोग्य सेवा अंधत्व नियंत्रण कार्यक्रम या पदावर तर पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांची मुंबई येथील आरोग्य सेवा औद्योगिक विभागाचे सहायक संचालक पदावर बदली करण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश राज्य सरकारचे अवर सचिव व.पां. गायकवाड यांनी काढले आहेत. पवार यांची पाच महिन्यातच तर हंकारे यांची अवघ्या तीनच महिन्यांतच उचलबांगडी करण्यात आली आहे. हा आरोग्यमंत्री तानाजी सावंतां(Tanaji Sawant) साठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Eknath Shinde & Tanaji Sawant
Dahi Handi 2023 : दहीहंडीत 'प्रचारा'चे थर ; शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरेंकडून 'निष्ठावंतां'ची दहीहंडी ; यंदा प्रथमच लोकलमधून प्रक्षेपण..

पुणे महापालिके(PMC) त 2011 पासून आरोग्य प्रमुख हे पद रिक्त आहे. डॉ. आर.आर परदेशी यांचा सेवा काल संपल्यानंतर तत्कालीन उप आरोग्य प्रमुख डॉ. एस.टी परदेशी यांच्याकडे या पदाचे प्रभारी कामकाज देण्यात आले होते. त्यानंतर 31 मे 2017 रोजी डॉ. परदेशी सेवा निवृत्त झाल्यानंतर मात्र, 2017 नंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांना हे पद न देता थेट त्यावर राज्य शासनाकडून अधिकारी नियुक्त करण्यात येत आहे.

कोरोना संकटाच्या आधी या पदावर शासनाने डॉ. रामचंद्र हंकारे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर, आता डॉ. आशिष भारती यांच्याकडे या पदाचा पदभार देण्यात आला होता.

Eknath Shinde & Tanaji Sawant
Manoj Jarange Arakshan : उपोषणाचा नववा दिवस; मनोज जरांगेची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी लावले सलाईन...

'' ...हे प्रकरण भोवल्याची पालिका वर्तुळात चर्चा!''

डॉ. आशिष भारती यांच्या पदावर नियुक्त करण्यासाठी राज्यातील एका मंत्र्याने लॉबिंग लावत महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी भगवान पवार यांची दोन वर्षांसाठी ११ मार्च २०२३ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या पाच महिन्याच्या कालावधीत डॉ. भगवान पवार हे काही कारणांमुळे वादग्रस्त ठरले. त्याचप्रमाणे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांनी १० लाखांची लाच घेतल्याचे प्रकरण डॉ. भगवान पवार यांना भोवल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com