Nashik municipal officer ED raid : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वाटप प्रकरणी 'ईडी' अॅक्शन मोडवर आली आहे.
या प्रकरणाशी निगडीत नऊ ठिकाणे छापे मारण्यात आले आहेत. मालेगाव महापालिकेतील जन्म-मृत्यू नोंद विभागातील अधिकारी तव्वाब शेख यांच्या घरी 'ईडी'ने छापा घालत काही दस्तावेज हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. ईडी अधिकाऱ्यांनी या कारवाईवर बोलण्यास नकार दिल्याने, पुढं यात नेमकं काय होत, याची चर्चा सुरू आहे.
भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्याविरोधात राज्यभर मोहीम सुरू केली आहे. किरीट सोमय्या स्वतः जाऊन तक्रार दाखल करत आहेत. मालेगावमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्र घुसखोरांना वाटण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एसआयटीने देखील कारवाई केली आहे.
संपूर्ण देशात 2 लाख बांगलादेशी घुसखोर गेल्या सहा महिन्यात आले असून मालेगाव (Malegaon) येथे किमान 1000 जणांचे वास्तव्य असल्याचा आरोप करीत यासंदर्भात काही पुरावे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना किरीट सोमय्या यांनी पूर्वी दिलेले आहेत. बांगलादेशी घुसखोरांना भारतात स्थायिक करण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत असून, यासाठी कोट्यवधी रुपयांची फंडिंग होत असल्याचा आरोप देखील किरीट सोमय्या यांनी केला. मालेगावात झालेल्या आर्थिक घोटाळ्यातील 389 कोटी रुपये बांगलादेशींच्या पुनर्वसनासाठी खर्च करण्यात आल्याचा देखील दावा केला आहे.
किरीट सोमय्या यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याची तक्रारीत पुढे तथ्य आढळले. यानंतर मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना निलंबित करण्यात आलं, तर नायब तहसीलदार संदीप धरणकर यांची विभागीय चौकशीचा आदेश दिला आहे.
या सर्व घडामोडीत मालेगाव शहरात बांगलादेशी, रोहिंग्या विरोधात जन्म-मृत्यू दाखले प्रकरणात 'एसआयटी'ने कारवाई केली. आता या प्रकरणी ईडीने आज सकाळी नऊ ठिकाणी छापेमारी केली. मालेगाव महापालिकेतील जन्म-मृत्यू नोंद विभागातील अधिकारी तव्वाब शेख यांच्या घरी देखील ईडीने छापा मारला. त्यांच्या घराची झडती घेतली, सहा तास ईडीचे अधिकारी घरातील लोकांची चौकशी करत होते. ईडीने काही जन्म-मृत्यू नोंदीचे दस्तावेज हस्तगत केले. मात्र यावर अधिक बोलण्यास ईडी अधिकाऱ्यांनी नकार दिला. ईडीच्या या छापेमारीची मालेगावत दिवसभर चर्चा होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.