Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse : शरद पवारांना सोडून अजित पवार गटात जाणार? काय ते खडसेंनी स्पष्टच सांगितलं...

Eknath Khadse clarifies speculations on leaving Sharad Pawar and joining the Ajit Pawar group : एकनाथ खडसे हे अजित पवार गटात जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. या सर्व चर्चांवर स्वत:एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका मांडत काय ते स्पष्ट केलं आहे.

Ganesh Sonawane

Eknath Khadse news : जळगाव जिल्ह्यात अजित पवार यांनी मोठा डाव टाकून शरद पवार गटातील माजी मंत्री सतीश पाटील , गुलाबराव देवकर यांच्यासह दोन माजी आमदार व शेकडो पदाधिकाऱ्यांना गळाला लावलं आहे. अजित पवार हे जिल्ह्यात पक्षप्रवेशाचा दुसरा टप्पा घेणार असून त्यात आणखी काही बडे नेते शरद पवारांना सोडून अजित पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचेही नाव घेतले जात होते.

एकनाथ खडसे हे अजित पवार गटात जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. या सर्व चर्चांवर स्वत:एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका मांडत काय ते स्पष्ट केलं आहे. आपण अजित पवार यांच्या गटात जाणार नाही. आपण शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ आहोत असे खडसे यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खडसे अजित पवार यांच्या गटात जातील या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

जळगाव मधील काही नेते अजित पवार यांच्या गटात गेली. ज्या लोकांना जायचे होते ते गेले, मात्र ज्यांना जायचं नव्हतं ते सगळे आमच्या सोबत राहिले आहेत. यानंतर आता कुठलाही गट अजित पवार यांच्या पक्षात जाईल असे वाटत नसल्याचे खडसे म्हणाले. आम्ही सर्व आता शरद पवार साहेबांसोबत आहोत असे खडसेंनी स्पष्ट सांगितलं.

ज्यावेळी पक्ष फुटला त्याचवेळी मला देखील आमच्या सोबत या असा अजित पवार गटाचा निरोप होता. परंतु मी त्यावेळी देखील मी अजित पवार गटात न जाता शरद पवार साहेबांसोबत राहिलो. अजित पवार गटात जाणार या केवळ चर्चा आहे आणि चर्चांना काही अर्थ नाही. आता कुठलाही गट अजित पवारांकडे जाण्याची शक्यता नाही असे एकनाथ खडसेंनी म्हटलं.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, शरद पवार साहेब जो निर्णय घेतील त्यानुसार माझाही निर्णय असेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या सर्व चर्चांकडे लक्ष न देता, पक्ष विस्तार कसा होईल यावर भर द्यावा. पवार साहेबांचे निर्देशच आपल्यासाठी अंतिम असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT