
Jalgaon BJP : भारतीय जनता पक्षामध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राज्यामध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या केल्या आहेत. यात जळगाव पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी जामनेरचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांची निवड करण्यात आलेली आहे. भाजपचे जेष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळेच त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
बाविस्कर हे अनेक वर्ष जामनेरचे तालुकाध्यक्ष राहिले आहेत. अतिशय समर्थपणे त्यांनी तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. संघटानात्मक कामाचा त्यांचा चांगला अनुभव आहे. तर जळगाव पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच जळगाव महानगर अध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक सूर्यवंशी यांना संधी मिळाली आहे.
राधेश्याम चौधरी हे स्रीरोग तज्ञ आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात त्यांना क्षेत्रप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. शिवाय गेल्या काही वर्षात त्यांनी पक्ष बळकटीकरणासाठी चांगले काम केले आहे. त्या कामाची पावती म्हणून त्यांना संधी देण्यात आली आहे. तर दीपक सूर्यवंशी यांनी याआधी देखील महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळलेली असल्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.
दोन मराठा व एक गुजर पदाधिकाऱ्यांवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्न भाजपने केलेला दिसतो. बाविस्कर व सूर्यवंशी हे मराठा आहेत तर चौधरी हे गुजर समाजाचे आहेत. विशेष म्हणजे डॉ. राधेश्याम चौधरी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पक्षासाठी केलेल्या कामाची पावती त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळवून देण्यास कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे.
जळगावात भाजपमध्ये सध्या एकहाती सूत्र आहेत. गिरीश महाजन सांगतील त्यावरच जळगाव भाजपमध्ये शिक्कामोर्तब होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यादृष्टीने युती झाली किंवा स्वतंत्र्य लढावे लागले तरी पक्षाला अपेक्षित यश साधण्यासाठी महाजन यांनी आपल्याशी जवळीक असलेल्या व पक्षात चांगले काम करु शकतील अशा चेहऱ्यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.