Girish Mahajan, Eknath Khadse. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse : खडसेंच्या भाजपमधील घरवापसीवर गिरीश महाजनांना काहीच अडचण नाही? नेमकं काय म्हणाले..

Girish Mahajan On Eknath Khadse : आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यावरुन जळगावच्या राजकीय वर्तुळात टोलेबाजी सुरु आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असलेले एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत खडसेंनी मुंबईत गुप्त भेट घेतली, या भेटीनंतर या चर्चा सुरु झाल्या.

नाथाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात त्यांचा जाहीर भाजप प्रवेश पार पडणार असल्याची चर्चा सध्या जळगावच्या राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान या घडामोडींवर आता खडसेंची राजकीय विरोधक मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत खडसेंना खोचक टोला लगावला आहे.

एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश तुमच्यामुळे रखडला आहे का? असा प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांना विचारला असता ते म्हणाले की, खडसेंचा प्रवेश माझ्यामुळे कसा काय रखडेल? मी कसं त्यांचा प्रवेश थांबवू शकतो. त्यांची डायरेक्ट दिल्लीला हॉटलाईन आहे. मी तर छोटा माणूस आहे, माझी मुंबईपर्यंत देखील हॉटलाईन नाही, मी आपल्या जळगाव जिल्ह्यापुरता बरा आहे. असा टोला महाजन यांनी खडसेंना लगावला आहे.

महाजन पुढे म्हणाले, निश्चितच खडसेंना भाजप प्रवेशासाठी वरतून ग्रीन सिग्नल मिळाला असेल, तर ठीक आहे. कोणाची काही अडचण आहे का? मागच्या वेळेस ते म्हटले होते की, आम्ही फोटो काढला, गळ्यात रुमाल टाकला आणि फोटोच गायब झाले, असं काहीतरी ते म्हणत होते. आपल्याला त्यांच्याबद्दलची काही माहिती नाही. मी भविष्यकार नाही, मी काय संजय राऊत आहे का? अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर केली.

खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात मला फारशी काही माहिती नाही. त्याबद्दल गुलाबभाऊंनाच माहिती आहे. खडसेंसंदर्भात तेच सध्या जास्त माहिती ठेवतात. त्यामुळे खडसेंबद्दल अधिक माहिती गुलाबभाऊच सांगू शकतील, मी सध्या अतिवृष्टीग्रस्त भागात दौरे करत आहे असं महाजन म्हणाले.

खडसेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या भव्य कार्यक्रमावर बोलताना महाजन म्हणाले, ती मोठी माणसं आहेत, त्यांचा वाढदिवस तसाच साजरा होईल. दिल्लीपासून सगळे लोक येतील. मी त्याबाबत काय टिका टिपण्णी करु, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही जाणार का? असं विचारल्यावर महाजन म्हणाले, आम्हाला तर अजून काही निमंत्रण नाही आणि असा 'जर-तर'चा प्रश्न नाही, जर निमंत्रण मिळालं तर त्या संदर्भात विचार करू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT