Eknath Khadse News: मोठी बातमी: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंचा पुढचा राजकीय धक्का; ठाकरेंच्या भेटीसाठी थेट गाठली 'मातोश्री'

Eknath Khadse Meet Uddhav Thackeray : एकनाथ खडसे विरुद्ध भाजप मंत्री गिरीश महाजन हा वाद सर्वश्रुत असतानाच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी निवासस्थानी येऊन भेट घेतल्याचं समोर आलं होतं. यानंतर एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील घरवापसीच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, खडसेंनी आणखी एक नवा धक्का दिला.
Eknath khadse Uddhav Thackeray .jpg
Eknath khadse Uddhav Thackeray .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे हे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. खडसे विरुद्ध भाजप मंत्री गिरीश महाजन हा वाद सर्वश्रुत असतानाच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी निवासस्थानी येऊन भेट घेतल्याचं समोर आलं होतं. यानंतर एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील घरवापसीच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, खडसेंनी आणखी एक नवा धक्का दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी शुक्रवारी (ता.9 जुलै) सदिच्छा भेट घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या भेटीवेळी ठाकरेंचे राज्यसभा खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते.

मात्र, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर आमदार एकनाथ खडसेंच्या मनात नेमकं काय सुरू याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहे. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही सातत्यानं खडसेंच्या भाजपमधील कमबॅकच्या चर्चा अनेकदा होत आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीवेळी विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना जोरदारपणे सुरू होती. त्यात त्यांच्या भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीचे फोटोही व्हायरल झाले होते. परंतू, महाराष्ट्रातील भाजपच्या काही प्रमुख नेत्यांमुळे त्यांची भाजपमधील घरवापसी रखडली होती. मात्र,आता पुन्हा एकदा खडसेंच्या भाजपमधील 'कमबॅक' चे संकेत दिले जात होते.

Eknath khadse Uddhav Thackeray .jpg
BJP News: भाजपच्या गोटात मोठी राजकीय घडामोड! 'दिल्लीश्वरां'ची नवी खेळी, तावडेंनी घेतली खडसेंची भेट; महाजनांच्या वाढत्या 'प्रस्था'ला धक्का?

तर या भेटीबाबत स्वतः एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भेट घेण्यासाठी विनोद तावडे त्यांच्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांनी आपलीही भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीदरम्यान कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.

ही केवळ साधी भेट होती आणि त्यामध्ये राजकीय समीकरणांवर कोणताही संवाद झाला नसल्याचंही खडसे यांनी सांगितलं. तरीही राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी, एकनाथ खडसे यांच्या पुढील राजकीय निर्णयाबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा चालना मिळाली असून आगामी काळात या घडामोडींवर सर्वांचे लक्ष राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com