Eknath Khadse : एकनाथ खडसेंची घरवापसी नाहीच! स्वतःच सगळं स्पष्ट सांगितलं, 'शरद पवारसाहेबांसोबत...'

Eknath Khadse Sharad Pawar BJP : माझे काही कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत ते ते म्हणत आहेत आपण भाजपमध्ये जाऊ हे मी अमान्य करणार नाही, असे खडसे म्हणाले.
Sharad Pawar, Eknath Khadse
Sharad Pawar, Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse News : एकनाथ खडसे यांची भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी नुकतीच भेट घेतली होती.त्यामुळे खडसे यांची घरवापसी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. खडसेंच्या भाजप प्रवेशाला काही स्थानिक नेत्यांकडून विरोध देखील करण्यात येत होता. अखेर या सगळ्याबाबत खडसेंनी आपली भूमिका मांडत ते भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

खडसे म्हणाले, त्यांना भाजपमध्ये जाण्यास कोणताही रस नाही. मी शरद पवारसाहेबांच्या बरोबर आहे आणि पवारसाहेच्या बरोबरच राहिल. माझे काही कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत ते ते म्हणत आहेत आपण भाजपमध्ये जाऊ हे मी अमान्य करणार नाही. मात्र मी पवारसाहेबांच्या बरोबर आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, गिरीश महाजन मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधला माणूस आहे. त्या संदर्भात त्याच्या मतदारसंघातही पोस्टर लागले होते. त्याच्याशी मी संघर्ष करतोय. ते दिवस विसरले की त्यांना राजकारणामध्ये तिकीट मिळत नव्हते. मी आग्रह धरला होता की गिरीश महाजन चांगला कार्यकर्ता आहे. त्याला संधी मिळाली पाहिजे.

Sharad Pawar, Eknath Khadse
Devendra Fadnavis: शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत जाणार?... जयंत पाटील-तावडेंची खरंच झाली का चर्चा? दिल्लीत बैठकीनंतर फडणवीसांकडून सगळं क्लिअर

अमित शाहांचा फोन अन्...

खडसे यांनी गौप्यस्फोट करताना सांगितले की, मला अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी दिल्लीला बोलावले होते. मी दिल्लीला गेले त्यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, लोकसभा आमचे काम करा. तुम्हाला लगेच भाजपमध्ये प्रवेश देता येणार नाही. जर भाजपमध्ये प्रवेश दिला तर स्थानिक कार्यकर्ते काम करणार नाहीत म्हणून सांगतायेत, सीट पाडणार असल्याचे ब्लॅकमेल करत आहेत. निवडणूक होऊद्या मग आपण निर्णय घेऊ. मग ब्लॅकमेल कोण करत होते?

Sharad Pawar, Eknath Khadse
Jalgaon BJP Politics: एकनाथ खडसेंच्या घरवापसीला विरोध; गिरीश महाजन लागले कामाला? 'ते' तीन नेते तातडीने मुंबईला रवाना!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com