Eknath khadse News: आजवर चोरीच्या अनेक घटना आणि प्रकार पहायला मिळाले आहेत. मात्र जळगाव शहरात विश्वासही बसणार नाही अशा वस्तू चोरीला जात आहेत. या प्रकाराने नागरिकांमध्येही घबराट आहे.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील राजकीय टीकेने जळगाव शहर नियमित चर्चेत असते. सध्या मात्र या शहरात चित्रविचित्र घटना चर्चेचा विषय आहेत. नागरिकांमध्येही त्याबाबत संताप आहे.
https://www.sarkarnama.in/topic/jalgaon-politics
जळगाव शहरातील मेहरून आणि शिवाजीनगर येथील स्मशानभूमी चर्चेत आहे. येथून अंत्यसंस्कार केलेल्या देहाच्या अस्थी चोरीला गेल्या आहेत. दोन वेळा हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलीसही या घटनांनी चक्रावून गेले आहेत.
या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी गृह विभागावर गंभीर टीका केली आहे. शहरात घरांसह स्मशानभूमी ही सुरक्षित राहिलेली नाही. कायदा आणि सुव्यवस्था खालावली आहे. पोलिसांचा धाक संपला. स्मशानभूमीत घडलेले प्रकार धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेज मधून शेतकऱ्यांच्या खात्यावर अत्यंत तोकडी रक्कम जमा होणार आहे. मनरेगा सारख्या योजनेत काम केल्यावर शेतकऱ्यांना मजुरी मिळणार आहे. सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अडचणी काय हेच कळले नाही, असे दिसून येते.
अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पेरणी केलेली पिके वाहून गेली आहेत. शेतातील मशागत वाया गेली. त्यासाठी कर्ज घेण्यात आले होते. पिक वाया गेल्याने कर्जफेड अडचणीत आहे. शेतकऱ्यांना यातून दिलासा द्यायचा असेल तर कर्जमुक्ती हाच पर्याय आहे, असे माजी मंत्री खडसे म्हणाले.
राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्तीचा प्रश्न टाळू नये. आज राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने आणि पिके वाया गेल्याने संकटग्रस्त आहे. त्याला शेती आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नवे कर्ज लागेल. हे सरकारच्या लक्षात का येत नाही? असा संताप खडसे यांनी व्यक्त केला.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.