Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse Politics: केळी उत्पादकांच्या प्रश्नावर नाथाभाऊ आक्रमक, म्हणाले, ‘जळगावचे तीन मंत्री काय कामाचे’

Eknath khadse on banana crop insurance, ministers visit and announcement, farmers issue crucial-एकनाथ खडसेंचा आरोप, शासनामुळेच केळी उत्पादक विम्यापासून वंचित

Sampat Devgire

Banana farmers News: जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक संकटात आहे. त्यातच अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या स्थितीत देखील शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे जळगावच्या नेत्यांत आरोप, प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

गेला आठवडा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी केळी उत्पादकांच्या समस्यांच्या विरोधात काढलेल्या आक्रोश मोर्चाने गाजला. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि बच्चू कडू यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप झाले.

गेले महिनाभर जळगाव जिल्हा अतिवृष्टी आणि नापिकीने त्रस्त आहेत. केळी उत्पादक संकटात सापडले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विविध भागांचा दौरा केला. शेतकऱ्यांशी चर्चा केली. शासनाच्या मदतीचे आश्वासन देखील दिले.

जिल्ह्यातील तीन्ही मंत्र्यांनी दौरे केले. मात्र राज्याप्रमाणेच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या आहे. तीव्र झाल्या आहेत. नैसर्गिक आणि अतिवृष्टीच्या आपत्तीमुळे जळगावचे मुख्य नगदी पीक असलेल्या केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम दिसू लागला आहे.

पार्श्वभूमीवर विरोधकांना राज्य शासनावर टीका करण्याची संधी मिळाली. ही संधी विरोधक सोडणार कशी?. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्य शासन आणि मंत्र्यांना टार्गेट केले आहे.

राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हक्काची असलेली फळपीक विमा योजना यंदा सरकारच्या उदासीनतेमुळे संकटात आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणारी विम्याची रक्कम शासनाने हप्ता आणि आवश्यक शुल्क न भरल्याने रखडली. याचा फटका हजारो केळी उत्पादकांना बसला, आरोप माजी मंत्री खडसे यांनी केला.

जळगाव जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती यंदा आहे. याबाबत श्री खडसे यांनी कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. केळी उत्पादकांनी वेळेत विम्याचा हप्ता भरला. तरीही ते विम्यापासून वंचित आहेत.

राज्य शासनाने याबाबत तातडीने दखल घ्यावी. तातडीने विम्याची रक्कम मिळावी. अन्यथा केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. सरकारने आणि जळगावच्या तिन्ही मंत्र्यांनी केळी उत्पादकांचा अंत पाहू नये, असा इशारा खडसे यांनी दिला आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT