BJP News : गोळीबार प्रकरणात भाजप नेत्याचा पाय खोलात, पोलिसांच्या हाती लागले महत्वाचे पुरावे

Nashik firing case : पंचवटी गोळीबार प्रकरणात पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांच्या हाती महत्वाचे पुरावे लागल्याने त्यांच्या अडचणी वाढू शकतात.
BJP leader Jagdish Patil
BJP leader Jagdish PatilSarkarnama
Published on
Updated on

BJP News : पंचवटी पेठरोडवरील राहुलवाडीत सराईत गुन्हेगार सागर जाधव याच्यावर मागील आठवड्यात दोन तडीपार गुंडांनी गोळीबार केला होता. या प्रकरणात पोलिसांनी भाजपचे माजी गटनेते व माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना रविवारी अटक केली. पाटील यांना जिल्हा न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि. 26) पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात पाटील यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे, कारण या कटकारस्थानात पाटील यांचा सहभाग असल्याचे महत्त्वाचे पुरावे पंचवटी पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याआधारे आता पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

खूनाच्या गुन्ह्यात आठवड्यापूर्वी भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे पोलिसांना शरण गेले होते. पोलिसांनी त्यांना अटक केली. तेही सध्या कोठडीत आहेत. पंचवटीमधील भाजपचे दोन्ही नगरसेवक गंभीर गुन्ह्यात गजाआड झाल्याने पंचवटीत भाजपचा गड डळमळीत झाल्याचे बोलले जात आहे.

पंचवटीतील सागर जाधव गोळीबार प्रकरणात संशयित रोहन भुजबळ यास कटकारस्थानात सहभागी असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने (दि. 26) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गोळीबारात भुजबळचा सहभाग कसा आणि काय याचा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान ज्या दोघांनी सागर जाधववर गोळीबार केला होता ते दोघेही संशयित फरार असून अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके परजिल्हा व परराज्यांत पाठविण्यात आली आहेत.

BJP leader Jagdish Patil
BJP Politics : 2 नगरसेवक कोठडीत, खून, गुन्हेगारीमुळे भाजप स्वतःच राजकीय जाळ्यात अडकला

या प्रकरणात उघडे टोळीचा हात असून या टोळीतील संशयित विकी उत्तम वाघ व विकी विनोद वाघ यांनी सागर जाधव याच्यावर गोळी झाडून जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला होता. मंगळवारी (दि. 16) रात्री दीडच्या सुमारास ही थरारक घटना घडली. याप्रकरणात उघडे टोळीतील 11 जणांना आतापर्यंत अटक केली आहे. संशयाची सुई भाजप नगसेवकाकडे गेल्याने रविवारी (दि. 21 ) भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

BJP leader Jagdish Patil
Nashik Kumbh Mela : पुरोहित चालतात मग साधु-महंत का नको? कुंभमेळ्यावरुन फडणवीसांच्या पुढ्यात नवा सवाल

निकम टोळीने किरण निकम खून प्रकरणाचा सूड उगवण्यासाठी जाधववर गोळीबार केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. या टोळीचा म्होरक्या शेखर निकम हा असून माजी नगरसेवक पाटील त्याच्या संपर्कात होते. न्यायालयीन सुनावणीसाठी निकमला आणले असता पाटील यांनी त्याची भेट घेतली होती. त्याचवेळी गोळीबार करणारे संशयितही त्याठिकाणी उपस्थित होते. यामुळे या कटकारस्थानात पाटील यांचा सहभाग स्पष्ट होत असून, त्यांच्या आर्थिक व्यवहाराचीही चौकशी होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com