Sharad Pawar, Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse News : पक्ष सोडल्यानंतरही एकनाथ खडसेंची आमदारकी कायम राहणार; काय आहे शरद पवारांची 'गॅरंटी'?

Sharad Pawar NCP : खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षातर्फे विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देण्यात आले होते. पक्ष फुटल्यानंतर खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासोबत राहिले. आता ते भारतीय जनता पक्षात घरवापसी करीत आहेत.

कैलास शिंदे

Jalgaon Political News : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षामधून भारतीय जनता पक्षात घरवापसी करण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांनी घेतला आहे. पक्षांतर केल्यामुळे त्यांची विधानपरिषदेतील आमदारकी जाणार त्यांना राजीनामा द्यावा लागणार अशी चर्चा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी आपण खडसे यांची आमदारकी परत घेणार नाही, अशी गॅरंटी दिली आहे. त्यामुळे भाजपमध्ये गेले तरी त्यांची आमदारकी कायम राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. Sharad Pawar clear that Eknath Khadse membership of Legislative Counsil.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे Eknath Khadse यांनी आपण भारतीय जनता पक्षात घरवापसी करीत आहोत अशी घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षातील केंद्रीय नेतृत्वाने आपल्या घरवापसीला मान्यता दिली आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात दिल्लीत केंद्रातील नेत्यांच्या उपस्थित प्रवेश होणार असल्याचेही बोलले जात आहे.

खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षातर्फे विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देण्यात आले होत. पक्ष फुटल्यानंतर खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar पक्षासोबत राहिले. आता ते भारतीय जनता पक्षात घरवापसी करीत असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीचा आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार असल्याच्या चर्चा होती. एकनाथ खडसे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा चार वर्षांचा कार्यकाळा बाकी आहे. त्यामुळे खडसे आपल्या आमदाकीचा राजीनामा देणार काय? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खडसे यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू असतानाच पक्षाचे नेते शरद पवारांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना आपण खडसे यांची आमदारकी परत घेणार नसल्याचे स्पष्ट केले. एकदा आपण दिलेल्या गोष्टी माघारी घेत नाही, असेही पवार यानी सांगितले. खडसेंच्या पक्षांतराबाबत शरद पवार म्हणाले, की त्यांच्या इतक्या चौकशा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यांना दैनदिन कुटुंब चालवणेही कठीण झाले होते. त्यामुळे ते हतबल झाले होते. त्यामुळे जिथे जावून तुम्हाला सोयीस्कर होणार आहे, तेथे तुम्ही जावा असे आपण त्यांना सांगितल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT