Satara Lok sabha News : 'सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नाही...' ; शिवेंद्रसिंहराजेंनी शिंदेंना डिवचलं!

Lok Sabha Election 2024 : सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटलं जायचं. आता तो बालेकिल्ला राहिलेला नाही, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.
Satara Lok sabha News
Satara Lok sabha NewsSarkarnama
Published on
Updated on

Satara News : आमदार शशिकांत शिंदे यांच्या आजच्या शक्तिप्रदर्शनाचे तुम्हाला आव्हान वाटते का? या प्रश्नावर भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आव्हान देण्यासाठीच निवडणूका असतात. पण, सध्या जिल्ह्यात भाजपची ताकत वाढली असून त्यातूनच आम्हाला भाजप उमेदवाराच्या विजयाची खात्री आहे. पूर्वी सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटलं जायचं. आता तो बालेकिल्ला राहिलेला नाही, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. (Latest Marathi News)

Satara Lok sabha News
Congress Vs NCP Ajit Pawar : लोकसभेत पंजा Vs घड्याळ आमना-सामना नाहीच !

आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शक्ती प्रदर्शन करत जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी त्यांनी शेंद्रे कारखान्यावरील कै. आमदार अभयसिंहराजे भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले तसेच कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगम या समाधीस्थळी अभिवादन करुन दर्शन घेतले. तसेच पी. डी. पाटील यांच्या स्मारकालाही भेट देऊन अभिवादन केले. आमदार शशिकांत शिंदेंच्या या शक्ती प्रदर्शनावरुन सातारा जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी भाष्य केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Satara Lok sabha News
NCP Ajit Pawar Group: भाजपला जोर का झटका; भुजबळ नसतील तर अरींगळेंना द्या उमेदवारी!

आमदार शशिकांत शिंदे यांचे तुम्हाला आव्हान वाटते का, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकत वाढलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वाढलेली ताकत लक्षात घेता आमची मागणी होती, की महायुतीत सातारा लोकसभेची जागा ही भाजपकडे राहावी.

Satara Lok sabha News
Mohite Patil Meet Pawar : धैर्यशील मोहिते पाटलांनी पुण्यात घेतली शरद पवारांची भेट; सांगोल्याचे देशमुखही सोबत!

पूर्वी सातारा (Satara) जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटलं जायचं. आता तो बालेकिल्ला राहिलेला नाही, हे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजपचे गाव पातळीवर काम करणारे छोटे कार्यकर्ते असतील. त्यांना ते पदाधिकारी झाले नसतील तसेच राजकारणात मोठे झालेले नसतील. पण, त्यांची सगळ्यांची मागणी होती की सातारची ही जागा भाजपनेच लढली पाहिजे.

Satara Lok sabha News
Mahayuti BJP Politics : महायुतीत झाले १६ भिडू, लोकसभेत जमेना, विधानसभेत काय घडेल?

अद्याप महायुतीच्या जागा वाटपात साताऱ्याचा उमेदवार जाहीर झालेला नाही. पण जो कोणी आमचा उमेदवार असेल तो उमदेवाराला चांगल्या मताधिक्याने निवडून येईल. राहिला विषय आव्हानाचा, आव्हान देण्यासाठीच निवडणूका असतात. पक्षाची ताकत वाढली आहे, त्यातूनच आम्हाला भाजपच्या (BJP) उमेदवाराच्या विजयाची खात्री आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com