Jalgon News : राज्यात कायदा सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती आहे. चोरी, दरोड्यांसह इतर गुन्हेदेखील वाढत आहेत. त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. कुणाकुणाचे काय भाग्य फुलते. रिक्षावाला मुख्यमंत्री होतो तर टपरीवाला मंत्री होतो. मुक्ताईनगरचे आमदार 50 कोटी घेऊन ओके होतात, असे सांगत एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
राज्यातील महायुतीचे हे तीन रंगाचे सरकार आहे. या सरकारची परिस्थिती म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका, असा हल्लाबोल एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांत सरकारमधील बेरोजगारी कमी झाली अन् राज्यात वाढली आहे, असेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.
येत्या काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का बसला आहे. गेल्या 35 वर्षांपासून विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात राजकारण करणारा शरद पवारांचा शिलेदार भाजपमध्ये दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संजय गरुड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावचे संजय गरुड हे गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विरोधात लढले आहेत. त्यांनी महाजनांविरोधात चार वेळा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना एकदाही यश मिळाले नव्हते.