Eknath Shinde : ‘त्या' आठ मिनिटांनंतर सीएम शिंदेंची राजकीय 'दृष्टी'ही अधिक तीक्ष्ण होणार ?

Marathi News : विना टाके, इंजेक्शनाशिवाय पार पडले ऑपरेशन; चष्म्याचा नंबरही होणार कमी
CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde News Sarkarnama
Published on
Updated on

Thane News : सरकारी, खासगी दौरे, बैठका थोड्याशा बाजुला ठेवून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी ठाण्यातील वावीकर हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे तासभर ‘ॲडमिट’ झाले. त्यांच्या दोन्ही डोळ्यांची नियमित तपासणी झाली; त्यानंतरच्या मोजून ८ मिनिटांतच शिंदेंच्या उजव्या डोळ्याचे ‘ऑपरेशन’ करण्यात आले. मोतीबिंदुमुळे त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या उपचारानंतर शिंदेंच्या चष्म्याचा नंबर कमी होणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, गेल्या दीड वर्षांत स्व:पक्षाचे (जुनी शिवसेना) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून (Uddhav Thackeray) मित्रपक्ष भाजपमधील काही नेत्यांच्या मनसुब्यांचे राजकीय ‘आपॅरेशन’ करणाऱ्या शिंदेंची या शस्त्रक्रियेमुळे राजकीय नजर आणखीणच तीक्ष्ण होऊ शकते, अशा प्रतिक्रियाही आता पुढे येऊ लागल्या आहेत.

CM Eknath Shinde News
Congress Leader Baba Siddique: चौकशीच्या ससेमिऱ्याने मुंबईतील काँग्रेस नेत्याचे गळाले 'ग्लॅमर'..!

ठाण्यातील डोळ्यांचे नामांकित डॉ. चंद्रशेखर वावीकर यांच्या वावीकर रुग्णालयात शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयातून मुख्यमंत्र्यांना तासाभरात घरी सोडण्यात आले. या शस्त्रक्रियेने मुख्यमंत्री शिंदे यांच्या चष्माचा नंबर ही निश्चित कमी होणार आहेच. शिवाय त्यांना दोन दिवस सक्तीचा विश्रांती (आराम) करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या शस्त्रक्रीयेनंतर मुख्यमंत्र्यांची राजकीय दृष्टी अधिक तीक्ष्ण होणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी वावीकर रुग्णालयात जाऊन डोळ्यांची तपासणी करुन घेतली होती. त्यानुसार शुक्रवारी त्यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे मुख्यमंत्री सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर शस्त्रक्रिया पार पडल्यावर ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घरी परतले. अवघ्या 8 मिनिटे चाललेल्या या शस्त्रक्रियेच्या वेळेस अमेरिकन कंपनीची लेन्सचा वापर करण्यात आल्याने त्यांच्या चष्माचा नंबर ही कमी होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉ वावीकर यांच्यासह 20 जणांचे पथक ऑपरेशनच्या वेळी तेथे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशी झाली शस्त्रक्रिया

शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांना कोणतेही इंजेक्शन दिले गेले नाही. तर, यावेळी बधीरीकरणासाठी डोळ्यात औषधाचे थेंब टाकण्यात आले. एकही टाका टाकण्यात आला नाही. याशिवाय त्यांना पेन किलरची एक ही गोळी देण्यात आली नसल्याची माहिती डॉ. वावीकर यांनी बोलताना दिली.

रुग्णालयात मुख्यमंत्र्यांसोबत होत्या त्यांच्या सौभाग्यवती

शस्त्रक्रियेसाठी साधारणपणे सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे यांच्यासोबत रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर काही मिनिटात मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेले गेले. अवघे 8 मिनिटे शस्त्रक्रिया चालली. तसेच त्यानंतर पावणे दहा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन दिवस मेडिटेशन केले आहे. हे मेडिटेशन कॉन्फिडन्स राहण्यासाठी केले. तसेच तत्पूर्वी देवालाही हात जोडले होते. अखेर ती शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असे डॉ. चंद्रशेखर वावीकर यांनी सांगितले.

(Edited by Sachin Waghmare)

CM Eknath Shinde News
Eknath Shinde : राज्यात 2 लाख 76 कोटींची गुंतवणूक, 64 हजार रोजगार; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी माहिती

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com