Eknath Khadse : नाशिक येथील महानुभव पंथाच्या संमेलनात आज (ता.३० ऑगस्ट) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) एकाच मंचावर उपस्थित होते. मात्र, मंचावर भाजप नेत्यांच्या गर्दीत खडसे हे एकाकी पडल्याचे चित्र बघायला मिळत होते. त्यामुळे संमेलन सभारंभाच्या मंचावर असूनही खडसे दूरच असल्याने यावरून जोरदार चर्चा रंगत आहेत. (Eknath Khadse, Devendra Fadnavis, Girish Mahajan Latest News)
नाशिकमध्ये तीन दिवसीय महानुभव पंथाच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र, असे यावेळी खडसेंनी महाजन आणि फडणवीसांपासून अंतर ठेवल्याचे दिसून आले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. संमेलन सुरू झाल्यानंतर अनेक कार्यक्रम पार पडले मात्र, खडसे कार्यक्रमाला आल्यापासून ज्या खूर्चीवरच शांत बसून होते. यामुळे खडसे एकाकी पडल्याची चर्चा सुरू झाली. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक दीनकर पाटील, भजपाचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी केले आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे आणि फडणवीस यांच्यातील राजकीय वाद राज्यातील जनतेपासून काही लपून राहीले नाही. एकनाथ खडसे यांनी आपली राजकीय मोठी कारकीर्द भाजपमध्ये गेलेली आहे. तसेच फडणवीस त्यांच्यासमोरच मोठ नेतृत्व मोठ झालं आहे. आपण फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडली, असे अनेकवेळा खडसेंनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे या व्यासपीठावर त्याचेच काहीसे पडसाद पाहण्यास मिळाले. आता आपल्या भाषणात खडसे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.