Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक युद्ध हे सर्वश्रुत आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, हे वारंवार दिसून आलं आहे. याचाच प्रत्यत पुन्हा एकदा आला आहे.
जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आक्रोश मेळाव्यात बोलताना, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मंत्री गिरीश महाजनांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांच्यावर टीका केल्याचे दिसून आले आहे, शिवाय राजकीय वर्तुळात तशी चर्चाही सुरू आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकनाथ खडसे म्हणाले, ''या जिल्ह्यात तुम्ही तीन-तीन मंत्री आहात, कोणतं सिंचनाचं काम केलं?, कोणतं धरण पूर्ण केलं?, अरे दिसताय धरणं ते नाथाभाऊंचे आहेत आणि हे विचारताय नाथाभाऊंनी जिल्ह्यासाठी काय केलं? 100 टक्के धरणं मी केली. मी जे बांधलेली धरणं आहेत पाडळसरेसारखी, अरे 10 वर्षे झाले मंत्री होता त्या खात्याचा, दमडी दिली नाही. मग बुटाने मारायला पाहिजे की नाही?''
गौणखनिज प्रकरणी १३८ कोटींची नोटीस आल्याने एकनाथ खडसे यांनी आजाराचे खोटे सोंग घेतले, असा कोणता हृदयविकाराचा झटका आला होता? असा सणसणीत टोला राज्याचे ग्रामविकासमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लगावला होता. जळगावच्या राजकारणात खडसे आणि महाजन यांच्यात नेहमीच राजकीय कुरघोडीची स्पर्धा सुरू असते. त्यात खडसेंच्या प्रकृतीबाबतही महाजन यांनी शंका उपस्थित केल्याने वाद अधिकच पेटला आहे.
''एकनाथ खडसे यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतल्यास राज्यातील सगळे प्रश्न सुटतील. त्यांना कोणताही आजार झाला नव्हता, त्यांना गौणखनिजप्रकरणी १३७ कोटींची नोटीस आल्याने ते मुख्यमंत्र्यांना फोन करून एअर अॅम्बुलन्सने मुंबई येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले,'' असा दावा महाजन यांनी केला होता.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.