NCP Politics: 'जयंत पाटलांनी घाण करायची अन् अजित पवारांनी ती साफ करायची का ?'; आमदार सोळंके भडकले

Prakash Solanke On Jayant Patil : "मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार होतो, पण... " आमदार सोळंकेंचा मोठा खुलासा
Prakash Solanke, Jayant Patil,Ajit Pawar
Prakash Solanke, Jayant Patil,Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, त्यावेळी त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज झाले होते. एवढंच नाही तर ते आमदारकीचा राजीनामाही देण्याच्या तयारीत होते, पण त्यांची समजूत काढत त्यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा शब्द मी (अजित पवार) आणि जयंत पाटलांनी दिला होता. मात्र, शब्द पाळला गेला नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शुक्रवारी केला.

अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर आमदार सोळंके (Prakash solanke) यांनी स्वत: माध्यमांशी संवाद साधत मोठा खुलासा करत जयंत पाटलांवर घणाघाती टीका केली. "जयंत पाटील तुम्ही घाण करायची आणि अजित पवारांनी ती साफ करायची का?", अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Solanke, Jayant Patil,Ajit Pawar
Baramati Loksabha : अजितदादांच्या बारामती लढविण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना सुळेंचे सूचक विधान; ‘माझ्या पोटात खूप गोष्टी...’

"राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा शब्द मला अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) दिला होता, पण जयंत पाटलांनी तो शब्द पाळला नाही. निवडीबद्दल काहीच निर्णय घेतला नाही," असं सोळंके म्हणाले. याचवेळी आमदार सोळंकेंनी मोठा खुलासा करत आपण आमदारकीचा राजीनामा देणार होतो, असंही सांगितलं आहे.

"मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार होतो, पण तेव्हा माझा राजीनामा थांबवला गेला. आता आम्ही सत्तेत सामील झालो तर ते म्हणताहेत, की अजित पवारांनी सोळंकेंना प्रदेशाध्यक्ष करावं, पण याचा अर्थ असा झाला की, जयंत पाटील (Jayant Patil) तुम्ही घाण करणार अन् अजित पवार (Ajit Pawar) यांनी ती साफ करायची का ?", असा घणाघात सोळंकेंनी जयंत पाटलांवर केला.

(Edited By - Ganesh Thombare)

Prakash Solanke, Jayant Patil,Ajit Pawar
Jitendra Awad : 'बापाची चप्पल घातली म्हणून बाप होता येत नाही; आव्हाडांनी अजितदादांना सुनावलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com