Girish Mahajan Vs Khadse : एकनाथ खडसे यांनी हृदयविकार झटक्याचे नाटक केले; गिरीश महाजनांनी डिवचलं!

Girish Mahajan Vs Eknath Khadse : खडसेंच्या प्रकृतीबाबत महाजन यांनी शंका उपस्थित केल्याने वाद-विवाद पेटण्याची चिन्हे...
Girish Mahajan Vs Eknath Khadse :
Girish Mahajan Vs Eknath Khadse : Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : गौणखनिज प्रकरणी १३८ कोटींची नोटीस आल्याने एकनाथ खडसे यांनी आजाराचे खोटे सोंग घेतले, असा कोणता हृदयविकाराचा झटका आला होता? असा सणसणीत टोला राज्याचे ग्रामविकासमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला आहे. जळगावच्या राजकारणात खडसे आणि महाजन हे समीकरणाचं नेहमीच एकमेकांवर राजकीय कुरघोडी होत असतात, आता खडसेंच्या प्रकृतीबाबत महाजन यांनी शंका उपस्थित केल्याने वाद-विवाद पेटण्याची चिन्हे आहेत. (Latest Marathi News)

Girish Mahajan Vs Eknath Khadse :
Eknath Khadse News : अँजिओप्लास्टीनंतर माझं हृदय १०० टक्के बंद पडलं...श्वासही थांबला; एकनाथ खडसेंनी सांगितली आपबिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती, त्याला उत्तर देताना महाजन म्हणाले, एकनाथ खडसे यांनी त्यांच्या तब्येतीची जी घेतल्यास राज्यातील सगळे प्रश्‍न सुटतील. त्यांना कोणताही आजार झाला नव्हता त्यांना गौणखनिजप्रकरणी १३७ कोटींची नोटीस आल्याने ते मुख्यमंत्र्यांना फोन करून एअर ऍम्बुलन्सने मुंबई येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले, असा दावा महाजन यांनी केला आहे.

महाजन पुढे म्हणाले, "असा कोणता हृदयविकाराचा झटका त्यांना आला? खोटी सोंगं करायची, उपचार घ्यायचे आणि परत इकडे येऊन आरोप करायचे याला काय म्हणावे. त्यापेक्षा एकनाथ खडसेंनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतल्यास सगळे प्रश्‍न सुटतील. राज्यात सरकार शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी समर्थ आहे, असेही महाजन यांनी सांगितले.

Girish Mahajan Vs Eknath Khadse :
Bhandara News : ‘पनौती’ शब्दावरून भाजप आपलंच हसू करून घेतेय

कापूस भावाबाबत बोलताना ते म्हणाले, "कापसाला सद्य:स्थितीला आठ हजार रुपयांपर्यंत भाव आहे. यंदा उत्पादन कमी असल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थितीमुळे त्याचा परिणाम निश्चित जाणवत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के पीकविम्याची भरपाई दिली जाणार असल्याचेही महाजनांनी स्पष्ट केले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com