Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंनी दिला पुणे शहर जलपर्णीमुक्तीचा शाश्वत मंत्र!

Sampat Devgire

मुंबई : मुळा, मुठा नदीपात्रातील जलपर्णींमुळे पुणेकर (Pune) त्रस्त आहेत. ५३ पैकी ३० किलोमीटर पात्रात जलपर्णी असल्याने प्रदुषणाबरोबरच (Polluation) नागरिकांना मोठा त्रास व आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यावर आज विधानसभेत झालेल्या लक्षवेधी सुचनेवरील चर्चेत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कायमस्वरूपी जलपर्णी मुक्तीचा मार्ग सांगितला.

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे शहरातील मुळा, मुठा नदीतील जलपर्णी व त्यामुळे होणारे प्रदुषण, नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास, त्यावरील उपाययोजना याविषयी लक्षवेधी मांडली होती. मुळा, मुठा नद्या पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातून वाहतात. त्यांच्या ५३ पैकी ३० किलोमीटर प्रवाहात मोठ्या प्रामणात जलपर्णी झाल्या आहेत. त्यातून नागरिकांना अनेक आजार संभवतात. प्रदूषण होते. जलपर्णी काढण्यासाठी कोट्यावधींचा खर्च करूनही त्या कायमस्वरूपी नष्ट होत नाही. शहरातील सांडपाणी प्रक्रीया न होताच नदीत मिसळते. यावर ठाण्याच्या उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी केलेला प्रयोग पुणे शहरातही करावा, अशी मागणी केली होती.

त्याला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, सांडपाणी प्रक्रीया न करताच नदीत मिसळते. ते जलपर्णींसाठी खाद्य असते. त्यामुळे जलपर्णी वाढतात. याबाबत पुणे शहरात नुकतेच ११ एसटीपी प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. यातील दोन प्रकल्पांचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भूमिपूजन झाले. त्यावर ४६०० कोटींचा खर्च होईल.

यासंदर्भात उल्हास नदी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी उगवल्या होत्या. जेसीबी व स्पायडर मशीनने ती काढली जात होती. मात्र कायमस्वरीपी उपाय होत नव्हता. त्याबाबत सगुना सरल फाऊंडेशनचे चंद्रशेखऱ खडसावळे यांच्या सल्ल्यानुसार उपाय करण्यात आला. महापालिका आयुक्तांसह आम्ही त्या भागाची पाहणी केली. सगुना फाऊंडेशनने त्यासाठी नदीत गवत्या, चांदोऱ्या, कटला, रोहू, सिरला हे मासे सोडली. हे मासे शेवाळ, जलपर्णींची मुळे व कुजलेले पदार्थ खातात. त्याने पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध होण्यास मदत होते.

या जनदीतील पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने त्याबाबत विशेष दक्षता घेण्यात आली. या जलपर्णींवर ग्लायकोसार्डची फवारणी केली जाते. अमेरिकेतील ग्लो फींच लॅबने सुचविलेले हे रसायन आहे. त्याची ठाणे येथील प्रतिष्ठीत प्रयोगशाळेत एक महिना चाचण्या केल्या. त्यात या रसायणाचा अंश पाण्यात उतरत नाही, असा निष्कर्ष आला. त्या फवारणीने ८ ते १० दिवसांत जलपर्णींची मुळे मरतात. ती पिवळी होऊन सुटी होतात. ती काढून टाकल्यावर ती पुन्हा होत नाही. त्यासाठी पारंपारीक उपायांपेक्षा अतिशय कमी खर्च येतो. पहिल्या वर्षी त्यासाठी २०२१ मध्ये ३० लाख तर यंदा २०२२ मध्ये २४ लाखांचा खर्च आला. त्यातून उल्हास नदीत आज जलपर्णी संपलेली आहे. तीथे पुन्हा पक्षी येऊ लागले आहेत. शाश्वत पद्धतीने जलपर्णी नियंत्रणात आणने सोपे झाले. अमेरिकेतील प्रयोगशाळेने त्यावर ग्लायकोसेट हे रसायन तयार केले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला या प्रयोगाविषयी माहिती व संबंधीतांशी संपर्क करून मुळा, मुठा नद्यांसाठी त्याची कार्यवाही करण्याबाबत सुचीत करण्यात येईल, असे श्री. शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे पुणे शहरातील जलपर्णींनावर शाश्वत उपाय होऊ शकेल.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT