नाशिक महापालिका निवडणूक कार्यक्रम अंमलबजावणी सुरूच ठेवणार

राज्य शासनाच्या आदेशाची महापालिका प्रशासनाला प्रतीक्षा.
NMC building |Nashik NMC election News
NMC building |Nashik NMC election NewsSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : राज्य शासनाने (State Government) स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना व निवडणूक (NMC) कार्यक्रम राबविण्याचा निर्णय आपल्याकडे घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधीमंडळात त्याबाबतचा प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर झाला. मात्र स्थानिक स्तरावर सुचना नसल्याने नाशिक (Nashik) महापालिकेने आपला निवडणूक कार्यक्रम अंमलबजावणी सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Nashik NMC election News Updates)

NMC building |Nashik NMC election News
नव्या निर्णयातून महाविकास आघाडीने केली भाजपची कोंडी!

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा कायदाच संमत केल्याने निवडणुका होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला असताना महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडून कुठलीच सूचना येत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेचा जाहीर केलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रारूप प्रभागरचनेवरील हरकती व सुनावणीची प्रक्रीया येत्या बुधवारी (ता.९) पूर्ण करून अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे.

NMC building |Nashik NMC election News
`त्या` टाईपिंग मिस्टेकविषयी आमदारांना गृहराज्यमंत्र्यांशी चर्चेची सूचना

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा भाग म्हणून राज्य निवडणूक आयोगाने १ फेब्रुवारीला प्रारूप प्रभागरचना जाहीर केली. १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या. ४४ प्रभागांसाठी २११ हरकती सादर झाल्या. राज्यातील इतर महापालिकांसाठी सादर झालेल्या हरकतींची संख्या अधिक असल्याने विलंब लक्षात घेऊन सुनावणीला मुदतवाढ देण्यात आली होती.

महापालिका निवडणूक कार्यक्रमानुसार सुनावणीची वेळ आली असताना राज्य शासनाने इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासाठी विधीमंडळात कायदा संमत केला. यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर गदा येण्याची शक्यता असल्याने त्याअनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना अंतिम करण्याचे प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com