Sharad Pawar, Eknath Shinde, Hemant Godse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hemant Godse News : महायुतीतून सीटिंग खासदाराचा पत्ता कट; गोडसे शरद पवार गटाच्या संपर्कात?

Nashik Lok Sabha 2024 : उमेदवारी मिळत नसल्याचे संकेत मिळताच खासदार हेमंत गोडसेंच्या निकटवर्तीयांकडून इतर पर्यायांची चाचपणी सुरू

Sunil Balasaheb Dhumal

Nashik Political News : महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघ मित्रपक्षाकडे जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सीटिंग खासदार हेमंत गोडसे आपल्या उमेदवारीसाठी विविध पर्यायांची चाचपणी करीत आहेत. त्यांचे समर्थक नाशिकच्या जागेबाबत अत्यंत आग्रही आहेत. यातून त्यांनी शरद पवार गटाशी संपर्क साधल्याची विश्वसनीय माहिती 'सरकारनामा'ला मिळाली आहे. यामुळे नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे आता नवे वळण घेणार असल्याची चर्चा आहे. Hemant Godse touch with Sharad Pawar for Contestant of Nashik Lok Sabha Constituency

खासदार गोडसे (Hemant Godse) मंगळवारी आपल्या निवडक समर्थकांसह नाशिकच्या उमेदवारीसाठी मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते. ते दुपारी अकरापासून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रयत्नशील होते. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची भेट होऊ शकली नाही. दुसरीकडे नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडल्याबाबत शिंदे गटाच्या वरिष्ठांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह खासदार गोडसे व्यथित आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवारीच्या अनिश्चिततेमुळे खासदार गोडसेंच्या समर्थकांनी इतर पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. यातील काही समर्थक उमेदवारी मिळवायचीच या इर्षेला पेटले आहेत. यातूनच गोडसेंच्या काही निकटवर्तीयांनी मंगळवारी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) एका नेत्याशी संपर्क केला. महाविकास आघाडीकडून खासदार गोडसेंच्या उमेदवारीबाबत चर्चा केली. त्यांचा पूर्ण मतदारसंघात जनसंपर्क असून, प्रचाराची एक फेरीदेखील पूर्ण केल्याचे सांगितले. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांशीही त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळाल्यास महाविकास आघाडीला भक्कम दावेदार मिळेल, असाही त्यांनी शरद पवार गटाकडे दावा केला.

दरम्यान, संबंधित नेत्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांशी मुंबईत संपर्क करून गोडसे यांच्या बाबतची माहिती दिली. त्यानंतर सुमारे तासाभराने याबाबत संबंधितांकडून उत्तरदेखील आले. महाविकास आघाडीत नाशिकच्या उमेदवारीबाबतची चर्चा खूप पुढे गेली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) बंडखोरांबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे ठाकरे सोडून गेलेल्या आणि शिंदे गटातील सहकाऱ्यांना पुन्हा प्रवेश देण्याबाबत नेते उत्सुक नाहीत. त्यामुळे गोडसे गटाची महाविकास आघाडीकडून उमेदवारीचा सुरू केलेले प्रयत्न पहिल्याच टप्प्यात संपुष्टात आले.

एकंदर नाशिक (Nashik) मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाची लोकसभा निवडणुकीसाठीची सर्व तयारी आहे. त्यांना संधी मिळेल की नाही हे अनिश्चित आहे. जागावाटपावर महायुतीतील भाजपचा प्रभाव असल्याचे बोलले जाते. जागांच्या अदलाबदलीत नाशिकची जागा शिंदे गटाची असतानाही सहकारी पक्षाला गेल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातूनच ते विविध पर्यायांची चाचपणी करीत असल्याचे दिसून येते.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT