Dada Bhuse`s new move : नाशिक महापालिक प्रशासकीय राजवट आल्याने भाजपची सत्ता गेली. त्यानंतरही भाजपचे मन या सत्तेतच रमल्याचे दिसत असते. मात्र या सर्वांवर पालकमंत्री दादा भुसे यांनी पाणी फिरवले आहे. (Dada Bhuse open his office in NMC head quarter may be the headach for BJP)
पालकमंत्री भुसे (Dada Bhuse) यांच्या विविध निर्णयांनी त्यांना महापालिकेच्या (NMC) कारभारात रस असल्याचे दिसते. त्यामुळे भाजप (BJP) विरूद्ध एकनाथ शिंदे गट असे राजकारण सातत्याने रंगल्याचे दिसून येते.
मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका मुख्यालयात संपर्क कार्यालय सुरू केले. त्याचे समर्थन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या सोईसाठी असल्याचे सांगितले होते.
आता नाशिक महापालिका मुख्यालयातदेखील पालकमंत्री दादा भुसे यांचे संपर्क कार्यालय लवकरच दिसून येणार आहे. यासंदर्भात भुसे यांनीच दुजोरा दिला आहे. नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी ते आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
मुंबई महापालिका मुख्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संपर्क कार्यालय सुरू केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या वॉर रूमला भेट देण्याबरोबरच समस्यांच्या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देत आहे. त्याचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात उमटले.
पालकमंत्री भुसे यांचे कार्यालय पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहामध्ये यापूर्वी गिरीश महाजन यांनी आपले कार्यालय सुरु करीत सबंध इमारत ताब्यात घेतली होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ते कार्यालय ताब्यात घेतले. सध्या पालकमंत्री भुसे यांचे कार्यालय तेथे आहे. एक कार्यालय असतानाही महापालिकेत कार्यालय सुरू करण्याच्या संकेतांनी अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. यानिमित्ताने महापालिकेच्या राजकारणात एकनाथ शिंदे गटाचे बस्तान बसविण्याच्या दृष्टीने भुसे यांनी भाजवरच राजकीय डाव उलटवल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.