Devendra Fadanvis : काँग्रेसची टीकाटिप्पणी संविधानाचे पावित्र्य नष्ट करणारी!

Congress reaction on SC verdict is as per there convenience-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयावरील काँग्रेसच्या प्रतिक्रीयेचा समाचार घेतला.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Devendra Fadanvis on Congress : आम्हाला न्याय मिळाला तर सर्वोच्च न्यायालय चांगले आणि आपल्या विरोधात निर्णय गेला तर सर्वाच्च न्यायालय वाईट. अशाप्रकारे संविधानावर टीकाटिप्पणी करून ते नष्ट करण्याचे काम ही मंडळी करीत असल्याचीही टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससह विरोधकांवर केली. (BJP leader & Dy. CM Fadanvis criticized Congress on SC verdict response)

भाजप (BJP) नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काँग्रेस (Congress) पक्ष अचानक सर्वोच्च न्यायालयाचे कौतुक करताना दिसत आहे. हे त्यांच्या सोयीचे राजकारण असल्याची टिका केली.

Devendra Fadanvis
ACB Nashik Trap : महसूल सप्ताहातच तहसीलदाराने १५ लाखांची लाच घेतली!

नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या दीक्षान्त सोहळ्याप्रसंगी उपस्थित असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी बारसू प्रकल्पावरून राज्य सरकारवर केलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले, कोकणातील बारसू प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांनी किमान अभ्यास करून बोलणे अपेक्षित होते. परंतु ते डोळ्यांवर पट्टी बांधून केवळ विरोधाला विरोध करणार असतील, तर त्यांना उत्तर तरी का म्हणून द्यायचे.

Devendra Fadanvis
Fadanvis on Police : फडणवीसांचा पोलिसांना सल्ला, प्रलोभनांना बळी पडू नये!

श्री. फडणवीस म्हणाले, कोकणातील प्रकल्पांविषयी अधिवेशनात सविस्तर माहिती दिली आहे. त्यानंतरही आदित्य ठाकरे त्या विषयाचा अभ्यास न करता बोलत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com