Eknath Shinde, Narendra Darade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC Seat : एकनाथ शिंदे ठाण्यासाठी नाशिकचा दावा सोडणार? विधानपरिषदेसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावावर चर्चा सुरु

Shiv Sena BJP dispute over Nashik and Thane MLC seats : ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असला तरी भाजपकडे मतदारसंख्या जास्त असल्याने ही जागा भाजपला हवी आहे.

Ganesh Sonawane

MLC seats Nashik, Thane : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून जागा वाटपाचे सूत्र ठरवले जात आहे. मात्र यावरुन आता महायुतीत वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण जिथे भाजपचे संख्याबळ अधिक आहे, तिथेच मित्रपक्षांनी जागांवर दावा सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे.

सुरुवातीला सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात प्राथमिक फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. महायुतीमध्ये भाजपने आपल्याकडे सर्वाधिक १२ जागा ठेवल्या होत्या. तर शिवसेनेच्या वाट्याला ३ जागा आणि राष्ट्रवादीला २ जागा सोडल्या होत्या. मात्र त्यानंतर शिवसेनेने आणखी दोन जागांची मागणी भाजपकडे केल्याची माहिती सूत्रांकडून कळाली आहे.

शिवसेनेने भाजपकडे कोकणातील रायगड, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि यवतमाळ या पाच जागांची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. तर राष्ट्रवादीनेही तीन जागांची मागणी केली आहे.

जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना नाशिक व ठाणे हा कळीचा मुद्दा ठरत आहे. नाशिकमध्ये शिवसेनेपेक्षा भाजपकडे मतदार संख्या जास्त असल्याने ही जागा भाजपला हवी आहे. तर मागच्यावेळी नाशिकमध्ये शिवसेनेचा आमदार होता. नरेंद्र दराडे हे शिवसेनेचे आमदार होते. दराडे ही पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. म्हणून शिवसेनेला ही जागा हवी आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरुन मोठा तिढा निर्माण झाला आहे.

ठाण्याची परिस्थिती काहीशी नाशिकप्रमाणेच आहे. ठाण्यात भाजपची संख्या जास्त आहे, शिवसेना दोन नंबरला आहे. शिवसेनेला तिथे बहुजन विकास आघाडीची मदत मिळाली तरच जागा घेऊ शकतात. भाजपकडे ४४४ इतके संख्याबळ आहे. शिवसेनेकडे ३४६ मते आहे. त्यामुळे आकड्यांच्या गणितात भाजप पुढे आहे.

त्यात ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने शिंदे गट ठाण्याची जागा सोडण्याच्या मनस्थितीत नाही. विशेषतः ठाणे महापालिकेतील अलीकडील भाजप-शिवसेना संघर्षानंतर शिंदे गट ठाण्याची जागा प्रतिष्ठेची मानत असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी स्थानिक भाजप नेत्यांनी या जागेवर भाजपचा दावा ठोकण्याची तयारी केली आहे. ही जागा भाजपलाच मिळावी असा आग्रह स्थानिक नेत्यांनी धरला आहे.

दुसरीकडे नाशिकमधील जागेवर शिवसेनेचे पारंपरिक वर्चस्व राहिले आहे आणि त्या जागेवरही शिंदे गट दावा करत आहे. नाशिकमध्ये महायुतीत भाजप आणि शिंदे गट दोघांकडेही प्रभावी स्थानिक नेटवर्क आहे. मात्र, भाजपकडे शिवसेनेपेक्षा अधिक मतदारसंख्या आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाशिकच्या जागेवर उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरु आहे. या जागेसाठी भाजपकडून गणेश गिते, निलेश बोरा यांची नावे चर्चेतून पुढे येत आहे.

शिवसेनेने नाशिकची जागा भाजपला सोडण्यास विरोध केला तर भाजप राष्ट्रवादीला सोबत घेऊन नाशिकची जागा लढण्याची शक्यता आहे. संख्याबळ पाहाता भाजप राष्ट्रवादीच्या मदतीने सहजपणे ही जागा जिंकू शकते. वेळ पडल्यास भाजप राष्ट्रवादीसह अपक्ष व महाविकास आघाडीतील घटकांची मदत देखील घेऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे एकंदरीतच परिस्थितीत पाहाता ठाण्याची जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे नाशिकच्या जागेचा त्याग करु शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ठाण्याची जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे व नाशिकची जागा भाजपकडे अशी वाटाघाटी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महायुतीमध्ये अंतिम फॉर्म्युला कसा ठरतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT