MLC Election News : विधानपरिषदेचा धुराळा : नाशिकमध्ये पुन्हा ‘दराडे पॅटर्न’? भाजप-शिवसेना समीकरणांवर सगळ्यांची नजर

MLC Election Nashik नाशिक विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. शिवसेनेकडून पुन्हा नरेंद्र दराडे हे इच्छुक असून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर, भाजपकडून अद्याप काही स्पष्टता नाही.
MLC Election News Nashik
MLC Election News NashikSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : राज्यातील सतरा विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था या मतदारसंघाचाही समावेश आहे. 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. 

नाशिक विधान परिषदेच्या २०१८ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांच्यात लढत झाली होती. खरं तर या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जातं होतं. मात्र तरीही शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंनी 200 मतांनी विजय मिळवला होता.

त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन प्रत्यक्षात मतदान मात्र शिवसेनेला केल्याने नरेंद्र दराडे निवडून आल्याचं मत काही राजकीय विश्लेषकांनी मांडले होते. मात्र, आपल्याला राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांची मदत लाभली, असा खळबळजनक दावा विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केला होता. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भुजबळांनी शिवसेनेला मदत केली हा शिवसेनेचा दावा फेटाळला होता.

यावेळेला देखील पुन्हा शिवसेनेकडून नरेंद्र दराडे हे इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेकडून निवडणुकीसाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत. सोमवारी खासदार श्रीकांत शिंदे योगायोगाने नाशिक दौऱ्यावर असतानाच निवडणुकांची घोषणा झाल्याने शिवसेनेच्या बैठकीत निवडणुकीविषयी चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपकडून वरच्या पातळीवर सर्व निर्णय घेतले जात असल्याने फारशी कुणाच्या नावाची ठोस चर्चा नसली तरी भाजपकडून या निवडणुकीत स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता भाजपकडून ही जागा शिवसेनेला सोडली जाण्याची शक्यता असल्याचं मत काही राजकीय विश्लेषकांचं आहे. दराडे यांना शिवसेना प्रवेशावेळी विधानपरिषदेचा शब्द दिला गेला असून त्याची उमेदवारी देखील कन्फर्म असल्याची माहिती काही सूत्रांनी दिली.

यावेळी त्यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी ही जागा लढावी अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना विधानसभा निवडणूक लढण्यात जास्त स्वारस्य असल्याने पुन्हा एकदा नरेंद्र दराडेच रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे.

परंतु पक्षीय बलाबल पाहाता, महापालिकेत शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र लढली होती तसेच नगरपालिकांच्या निवडणुकीतही त्यांनी भाजप विरोधात एकमेकांना मदत केली होती. ते गणित लक्षात घेता शिवसेनेचे मतदार व राष्ट्रवादीचे मतदार मिळून बहुमताच्या जवळ पोहचते. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपची साथ दिल्यास भाजपचे पारडे जड पडेल. थोडक्यात राष्ट्रवादीचा कल निर्णायक राहील.

नगरपालिका पक्षीय बलाबल असे....

शिवसेना (नगराध्यक्षासह) ९३

भाजप (नगराध्यक्षासह)७१

राष्ट्रवादी कॉंग्रेस (नगराध्यक्षासह)६६

शिवसेना(उबाठा)२७

राष्ट्रवादी कॉंग्रेस ०३

आरपीआय २

कॉंग्रेस १

अपक्ष १२

नाशिक महापालिका बलाबल

भाजप - ७२

शिवसेना-२६

शिवसेना उबाठा -१५

कॉंग्रेस -३

राष्ट्रवादी-४

मनसे -१

अपक्ष-१

मालेगाव महापालिका बलाबल

इस्लाम पक्ष -- ३५

समाजवादी पार्टी -- ५

शिवसेना -- १८

भाजप -- २

काँग्रेस -- ३

एमआयएम -- २१

-----------

एकूण. ८४

एकुण भाजप मतदार -१४४

एकुण शिवसेना मतदार-१३७

एकुण राष्ट्रवादी मतदार -७०

एकुण शिवसेना उबाठा मतदार-४२

एकुण राष्ट्रवादी कॉंग्रेस मतदार -७

एकुण कॉंग्रेस मतदार-७

एकुण मतदार मनसे -१

एकुण मतदार आरपीआय- २

अपक्ष -१३

एकुण मतदार- ४२३ (यात स्विकृतची संख्या धरलेली नाही तेही मतदार ठरतील)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com