Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde : भाजपच्या 100 प्लस घोषणेला शिंदेंनी प्रेमाने घेतलं, अन् त्या चर्चेला दिला विराम!

Eknath Shinde addressing party workers in Nashik : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये शिवसेनेची बूथप्रमुख कार्यशाळा व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केलं.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. महायुती एकत्रित निवडणूक लढवणार की नाही हे स्पष्ट नसताना भाजपने हा नारा दिल्याने भाजपने अप्रत्यक्षपणे स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. अशा स्थितीत शिवसेना देखील भाजपच्या शंभर प्लसला उत्तर म्हणून स्वबळाची भूमिका घेईल असे वाटत होते.

परंतु काल नाशिकमध्ये झालेल्या शिवसेनेच्या बूथप्रमुख कार्यशाळा व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी स्वबळाच्या चर्चेला एकप्रकारे विरामच दिला. त्यांनी आपल्या भाषणात वारंवार आपल्याला नाशिक महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकावयाचा आहे असाच उल्लेख केला.

शिंदे म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये आपण सगळे मंत्री, खासदार, आमदार यांनी कार्यकर्ता बनून त्यांच्या विजयासाठी लढायचं आहे. राज्यभरातील महापालिका, पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर आपल्याला महायुतीचा फगवा फडकावयचा आहे. नाशिकमध्येही आपल्याला महायुतीचाच भगवा फडकवायचा आहे. स्थानिक निवडणुका हाच आपला पाया असल्याने कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका आपल्याला जिंकाव्या लागणार असल्याचं शिंदे म्हणाले.

त्यामुळे साहजिकच नाशिकमध्ये आगामी महापालिका निवडणुक महायुती एकत्रित लढवणार की स्वबळावर असा संभ्रम असताना एकनाथ शिंदेंच्या मनात तरी महायुती म्हणूनच निवडणुकांना समोरे जाण्याची भूमिका दिसते आहे. भाजपने शंभरहुन अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा नारा दिला आहे. मग अशा स्थितीत महायुती म्हणून लढल्यास शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीला(अजित पवार गट) काय दहा-दहा जागा देणार काय? असाही प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शिंदे नाशिकमधील मेळाव्यात स्वबळाची घोषणा करतील असे बोलले जात होते.

परंतु एकनाथ शिंदेच्या मनात सध्या तरी महायुतीचा भगवाच आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या निवडणुकीत राज्यभरात महायुतीचा भगवा भडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. त्यासाठी परिश्रम घ्या. महायुती सरकारे राबवलेल्या योजनांची माहिती मतदारापर्यंत पोहचवा. प्रत्येक कार्यकर्त्याने महायुतीचे मताधिक्य वाढविण्यासाठी एकनाथ शिंदे बनून काम करा अशा सूचना त्यांनी शिवसैनिकांना केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT